शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

विद्यापीठाकडे परीक्षा अर्जच पोहचले नाहीत; आठ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:11 IST

विद्यापीठ : महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज दाखल केले नसल्याचा दावा; विद्यार्थी, पालकांची धांदल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून चार जिल्ह्यांत सुरुवात झाली. या परीक्षेसाठी ८४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील परीक्षेला सुरुवात होईपर्यंत ७५ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जनरेट करण्यात आले. अनेकांना विना हॉलतिकीट नंबरवर परीक्षा देण्याची मुभा दिली. त्याच वेळी आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नसल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना चार जिल्ह्यांतील २६८ होम सेंटरवर मंगळवारपासून सुरुवात झाली. पदवीच्या १८ अभ्यासक्रमांना ८४ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यातील ८४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यातील ७५ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट परीक्षा विभागाने परीक्षेला सुरुवात होण्याच्या मिनिटापर्यंत ऑनलाइन जनरेट केले. उर्वरित आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नसल्यामुळे संबंधितांचे हॉलतिकीट बनले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षाही देता आली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. हा प्रकार परीक्षा विभागासह महाविद्यालयांची दिरंगाई आणि बेपर्वाईमुळे घडल्याचे महाविद्यालयातील प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हॉलतिकीट ऐवजी मिळाले नंबरविद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होईपर्यंत अनेक केंद्रांवर हॉलतिकीट मिळालेच नव्हते. त्याचवेळी परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन जनरेट करीत महाविद्यालयांच्या लाॅगिनमध्ये पाठविण्यात आले. मात्र, परीक्षेला सुरुवात होईपर्यंत हे हॉलतिकीट डाऊनलोड झालेच नव्हते. त्यामुळे परीक्षा विभागाने दिलेल्या परीक्षा क्रमांकावर ऐनवेळी परीक्षा घेण्यात आली. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नाहीत. त्या विद्यार्थ्यांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले.

१२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षेपासून रोखलेबी.एस्सी संगणकशास्त्र या विषयात प्रथम सत्राची परीक्षा देणाऱ्या १२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षेपासून रोखल्याचा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांची तातडीने पर्यायी व्यवस्था करून होम सेंटरवर परीक्षा घेतल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. तसेच या महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, चौकशी समिती नेमणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्ज प्राप्त विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट दिलेपदवी प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या तरी महाविद्यालयांकडून आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विद्यापीठ परीक्षा विभागाकडे दाखल झाले नाहीत. १५ डिसेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले, त्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट दिले असून, ते परीक्षा देत आहेत.-डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरexamपरीक्षाStudentविद्यार्थी