आठ तालुक्यातून पाचशेवर बदल्या !
By Admin | Updated: June 5, 2016 00:36 IST2016-06-05T00:27:41+5:302016-06-05T00:36:27+5:30
उस्मानाबाद : जिल्हास्तरीय आपसी बदली २ जून रोजी पार पडल्या. त्यानंतर शनिवारी तालुकास्तरावर विंनती आणि प्रशासकीय बदली प्रक्रिया घेण्यात आली

आठ तालुक्यातून पाचशेवर बदल्या !
उस्मानाबाद : जिल्हास्तरीय आपसी बदली २ जून रोजी पार पडल्या. त्यानंतर शनिवारी तालुकास्तरावर विंनती आणि प्रशासकीय बदली प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी विविध तालुक्यांतील मिळून सुमारे पाचशेवर शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासाठी समुपदेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
जिल्हास्तरीय विनंती बदल्या रद्द करण्यात आल्यानंतर शासनाने जिल्हास्तरीय आपसी आणि तालुकास्तरीय विनंती व प्रशासकीय बदल्यांसाठी ५ जूनपर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने बदल्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. नियोजनानुसार २ जून रोजी जिल्हास्तरावर आपसी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ७८ गुरूजींना त्यांच्या सोयीच्या शाळा मिळाल्या. त्यानंतर शनिवारी तालुकास्तरावर बदली प्रक्रिया घेण्यात आली. ही प्रक्रिया सुरळी पार पडावी, यासाठी विशेष कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार वाशी तालुक्यातील ३७ जणांच्या बदल्या झाल्या. यापैकी ३० जणांची प्रशासकीय तर ७ जणांची विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. लोहारा तालुक्यातील ४१ जणांना मागणीप्रमाणे शाळा मिळाल्या. यातील ८ जणांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातून सर्वाधिक १०८ गुरूजींच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय ९२ तर १६ विनंती बदल्यांचा समावेश आहे.
उमरगा तालुक्यातील ७७ जणांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये २ विनंती बदल्या आहेत. भूम तालुक्यातून ४६ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर ९ आणि ३६ सहशिक्षकांचा समावेश आहे. ८९ जणांनी बदलीसाठी विनंती केली होती. परंतु, सोयीच्या शाळा न मिळाल्याने १ एकाचीच बदली झाली आहे. उर्वरित ८८ जणांनी नकार दिला. उस्मानाबाद तालुक्यातूनही १०१ गुरूजींच्या बदल्या झाल्या आहेत. या सर्व प्रशासकीय कारणावरून. यात केंद्र प्रमुख १, मुख्याध्यापक ५, प्राथमिक पदवीधर २१ आणि ७४ सहशिक्षकांचा समावेश आहे. कळंब तालुक्यातूनही ६७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्याध्यापक ३, प्राथमिक पदवीधर १४ आणि ५० सहशिक्षकांचा समावेश आहे. ही सर्व प्रक्रिया समुपदेशन पद्धीने राबविल्याने गुरूजींना त्यांच्या मागणीनुसार शाळा मिळाल्या आहेत. प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी गटशिक्षण अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.