जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
By Admin | Updated: June 2, 2016 23:22 IST2016-06-02T23:16:13+5:302016-06-02T23:22:03+5:30
परभणी : जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी २ जून रोजी काढले आहेत़

जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
परभणी : जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी २ जून रोजी काढले आहेत़
पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी प्रशासकीय कारणावरून या बदल्या केल्या आहेत़ त्यात नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस़ के़ माच्छरे यांची बदली पाथरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़ पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एऩ बी़ ठाकूर यांची जिल्हा विशेष शाखेत, नवा मोंढा पोलिस ठाण्याचे अशोक घोरबांड यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे़ मात्र नवा मोंढा पोलिस ठाण्यास अद्याप अधिकारी दिलेला नाही़ सोनपेठ पोलिस ठाण्याच्या मीना कर्डक यांची पोलिस कल्याण व मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली आहे़ तसेच एम़ ए़ रौफ यांची नानलपेठ पोलिस ठाण्यात, आऱ पी़ गाडेकर यांची पूर्णा, एस़ आऱ कोल्हे यांची पालम पोलिस ठाण्यात तर एस़ एस़ डोके यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे़ पाथरीचे पोलिस निरीक्षक सुधाकर जगताप यांची लातूर जिल्ह्यात बदली झाली आहे़ जगताप यांनी विनंतीवरून बदली झाल्याचे म्हटले आहे़ तर आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीवरून बदली झाल्याची चर्चा पाथरीमध्ये होत आहे़ विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वीच पाथरी, पूर्णा, नानलपेठ आणि नवा मोंढा येथील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या़ (प्रतिनिधी)