शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांमध्ये े७७१ रोहित्र नादुरुस्त

By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST

विशाल सोनटक्के, उस्मानाबाद अत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरींमध्ये अल्पसा पाणीसाठा असला तरी तो उभ्या पिकाला देता येत नसल्याने त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.


विशाल सोनटक्के, उस्मानाबाद
अत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरींमध्ये अल्पसा पाणीसाठा असला तरी तो उभ्या पिकाला देता येत नसल्याने त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ७७१ ट्रान्सफार्मर फेल झाले असून, ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी शेतकऱ्यांना तालुका ते जिल्हा अशा फेऱ्या माराव्या लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. विशेष म्हणजे, २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तब्बल २७ ट्रान्सफार्मर नादुरूस्त होते.
शहरी भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील नागरिकांची भारनियमनाच्या संकटातून काहीशी सुटका झाली आहे. मात्र, दुष्काळाशी दोनहात करीत असलेला शेतकरी मात्र भारनियमनाच्या कचाट्यात सापडला आहे. ग्रामीण भागात दररोज तब्बल सहा ते दहा तास भारनियमन सुरू असून, काही तांत्रिक अडचण आल्यास भारनियमनाच्या वेळेशिवायही वीज बंद राहत असल्याने तब्बल दोन-दोन दिवस शेतकऱ्यांना अंधारात काढावे लागत आहेत.
एप्रिल २०१४ मध्ये तब्बल १२६ ट्रान्सफार्मर जळाले होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत ट्रान्सफार्मर नादुरूस्तीचा सिलसिला असाच कायम असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर महिन्याच्या २२ तारेखपर्यंत जिल्ह्यात तब्बल १५२ ट्रान्सफार्मर जळाल्याची नोंद वीज वितरण कंपनीकडे आहे. वीज चोरी, तसेच अतिरिक्त दाब या प्रमुख कारणांमुळे हे ट्रान्सफार्मर जळत असल्याचे सांगितले जाते. मात्र, या दोन्ही समस्यांतून मार्ग काढण्यास वीज वितरण कंपनीला अपयश येत असल्याचे दिसते.
माहितीही संशयाच्या भोवऱ्यात
वीज वितरणकडे अनेक कामांसाठी हेलपाटे मारून शेतकरी त्रस्त आहे. मात्र, अगदी लाईनमनपासून जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही दाद द्यायला तयार नाही. जिल्ह्यातील किती ट्रान्सफार्मर रिप्लेस करून द्यावयाचे शिल्लक आहेत, याची माहिती अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे विचारली असता तेर येथे ३, भूम २, परंडा ३, कळंब १०, वाशी ४ आणि उस्मानाबाद ग्रामीण ५ असे २७ ट्रान्सफार्मर रिप्लेस करून द्यावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याच दिवशी वीज वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयाकडे याविषयी माहिती विचारली असता भूम, वाशी आणि परंडा या तीन तालुक्यातच तब्बल २२ ट्रान्सफार्मर नादुरूस्त असल्याचे दिसून आले. त्यामुळेच कंपनीने दिलेली माहितीही संशयाच्या भोवऱ्यात येते.
दरम्यान, याबाबत वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांच्याशी संपर्क साधला असता बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले.
ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जीवघेणी परीक्षा सुरू होते. संबंधित लाईनमनला ट्रान्सफार्मर जळाल्याची माहिती दिल्यानंतर तो याबाबतचा फिल्ड रिपोर्ट सहाय्यक अभियंत्यांना देतो. सहाय्यक अभियंता ही माहिती उस्मानाबाद येथील वरिष्ठ कार्यालयाला कळवितात. त्यानंतर जळालेल्या ट्रान्सफार्मरवर किती कनेक्शन आहेत. तसेच त्यांच्याकडे किती थकबाकी आहे, याची माहिती मागविली जाते. थकबाकी असल्यास ते भरल्याशिवाय ट्रान्सफार्मर रिप्लेस करून मिळणार नाही, असे सांगितले जाते. काही शेतकरी तातडीने पैसे जमा करून त्याच्या पावत्या संबंधित कार्यालयात भरतता. मात्र, एवढ्यावरही या शेतकऱ्यांची सुटका होत नाही. ट्रान्सफार्मर उतरविण्यापासून तो दुरूस्तीसाठी संबंधित कार्यालयात पोहोंचविण्यापर्यंतची सर्व कामे लाईनमनच्या देखरेखीखाली या शेतकऱ्यांनाच करावी लागतात. विशेष म्हणजे, ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी नेताना केलेल्या खाजगी गाडीचा खर्चही अनेक वेळा या शेतकऱ्यांच्याच माथी मारला जात असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही ट्रान्सफार्मरच्या अनुषंगाने अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे, काही तालुक्यांमध्ये तर ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी अवघा एक कर्मचारी असल्याने या कर्मचाऱ्याची बडदास्तही या नागरिकांनाच ठेवावी लागत असल्याचे दिसते. मात्र त्यानंतरही वीज कंपनीला पाझर फुटत नसल्याचे चित्र आहे.