बस-ट्रक अपघातात आठ जखमी

By Admin | Updated: June 27, 2017 00:37 IST2017-06-27T00:32:53+5:302017-06-27T00:37:06+5:30

माजलगाव : परभणीहून बीडकडे जाणाऱ्या बसला तेलगावकडे जाणाऱ्या ट्रकने जोराची धडकी दिली.

Eight injured in bus-truck crash | बस-ट्रक अपघातात आठ जखमी

बस-ट्रक अपघातात आठ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : परभणीहून बीडकडे जाणाऱ्या बसला तेलगावकडे जाणाऱ्या ट्रकने जोराची धडकी दिली. यामध्ये बसमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहरालगत असलेल्या परभणी टी पाँर्इंट वळणावर सोमवारी सकाळी घडली.
परभणी-बीड ही बस (एम.एच.२०-बी.एल.३३५१) बीडकडे जात होती. एवढ्यात माजलगावहून तेलगावकडे जाणाऱ्या ट्रकने (एपी.०४-६६६७) बसला जोराची धडक दिली. यामध्ये बसची एक बाजू पूर्णत: चेमटली होती. अपघातातील आठ लोकांना तात्काळ माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

Web Title: Eight injured in bus-truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.