आठ दिवसापासून करवंजी अंधारात

By Admin | Updated: July 4, 2016 00:16 IST2016-07-04T00:02:53+5:302016-07-04T00:16:03+5:30

माकणी : उमरगा- लोहारा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेले करवंजी (ता़लोहारा) हे गाव मागील आठ दिवसांपासून अंधारात आहे़ गावाला विद्युतपुरवठा करणाऱ्या डीपीवरील

From eight days in the Karvangi darkness | आठ दिवसापासून करवंजी अंधारात

आठ दिवसापासून करवंजी अंधारात


माकणी : उमरगा- लोहारा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेले करवंजी (ता़लोहारा) हे गाव मागील आठ दिवसांपासून अंधारात आहे़ गावाला विद्युतपुरवठा करणाऱ्या डीपीवरील ट्रान्स्फार्मर जळून आठवडा लोटला तरी त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ वीज नसल्याने गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ तर विजेअभावी अनेक कामे रखडल्याने संताप व्यक्त होत आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील करवंजी हे गाव ११५० लोकवस्तीचे आहे़ या गावाला एका डीपीवरून विद्यूत पुरवठा केला जातो़ मात्र, या डीपीतील ट्रान्स्फार्मर जळणे, आर्थिंग बंद पडणे, वायर तुटणे, किटकेट नसणे, कमी दाबाचा वीजपुरवठा अशा एक ना अनेक तांत्रिक कारणांनी ग्रामस्थांना सतत खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे़ मागील आठवड्यापूर्वी याव डीपीचे ट्रान्स्फार्मर जळाले आहेत़ ट्रान्स्फार्मर जळून आठवडा झाला तरी तो दुरूस्त करण्यात आलेला नाही़ वीजपुरवठा बंद असल्याने गावातील पाणीपुरवठा बंद पडला असून, कुपनलिकेचेही पाणी मिळेना झाले आहे़ परिणामी शेतशिवारातील विहिरीतून पाणी उपसून आणावे लागत आहे़ विजेवरील लघू उद्योग अद्यापही बंद पडले आहेत़ एकूणच विजेअभावी अनेक कामे खोळंबत आहेत. (वार्ताहर)

Web Title: From eight days in the Karvangi darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.