ईदनिमित्त बाजारपेठ सजली
By Admin | Updated: June 24, 2017 23:40 IST2017-06-24T23:35:24+5:302017-06-24T23:40:22+5:30
परभणी : रमजान ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली असून यानिमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

ईदनिमित्त बाजारपेठ सजली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रमजान ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली असून यानिमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. सौंदर्यप्रसाधने वस्तूंसह खाद्यपदार्थ, कपड्यांच्या दुकानांनी बाजारपेठ सजली आहे.
रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी, विक्री होते. यावर्षी आठ दिवसांपासून बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे. कच्छी बाजार, जनता मार्केट, गुजरी बाजार आदी भागात व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. जनता मार्केट ते कच्छी बाजार भागात किरकोळ व्यापाऱ्यांनी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. आठ दिवसांपासून या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.
ईद सणाच्या निमित्ताने नवे कपडे खरेदी केले जातात. त्यामुळे कापड दुकानांवर खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. तसेच बांगड्या, कानातले, गळ्यातील हार, मेंहदी कोन आदी सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर गर्दी होत आहे.
ईद सणाच्या दिवशी शिरखुर्मा तयार केला जातो. शिरखुर्मासाठी लागणाऱ्या शेवया, खारीक, बदाम, खिसमीस, मनुके बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.