परभणी जिल्ह्यात ईद उत्साहात

By Admin | Updated: July 7, 2016 23:37 IST2016-07-07T23:34:38+5:302016-07-07T23:37:46+5:30

परभणी : गुरुवारी जिल्हाभरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Eid in Parbhani district | परभणी जिल्ह्यात ईद उत्साहात

परभणी जिल्ह्यात ईद उत्साहात

परभणी : गुरुवारी जिल्हाभरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
परभणी शहरात यावर्षी प्रथमच तीन ठिकाणी सामूहिक नमाज अदा करण्यात आली. शहरातील इदगाह मैैदान येथे सकाळी ९.३० च्या सुमारास सामूहिक नमाज अदा करण्यात आली. या प्रसंगी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल महिवाल, पोलिस अधीक्षक नियती ठाकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार संतोष रुईकर आदींनी प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, राजेंद्र वडकर, पंजाबराव देशमुख, नगरसेवक सचिन देशमुख, विजय धरणे, दिनेश परसावत, सुशील नर्सीकर, आयुक्त राहुल रेखावार, मेहराज कुरेशी आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येकाने वृक्ष लागवड व जलपूनर्भरण करावे, असे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात आले. शहरातील धाररोड येथील अमीनसहाब बाबा दर्गा, साखला प्लॉट या ठिकाणी देखील सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

Web Title: Eid in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.