शहरात ईद-उल-फित्र उत्साहात
By Admin | Updated: June 27, 2017 01:04 IST2017-06-27T01:02:09+5:302017-06-27T01:04:50+5:30
औरंगाबाद : रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे मुस्लिम बांधवांनी सोमवारी सकाळी ‘फितरा’ आणि ‘जकात’ देऊन ईद-उल-फित्रची मुख्य नमाज अदा केली.

शहरात ईद-उल-फित्र उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे मुस्लिम बांधवांनी सोमवारी सकाळी ‘फितरा’ आणि ‘जकात’ देऊन ईद-उल-फित्रची मुख्य नमाज शहर आणि ग्रामीण भागातील १५ इदगाह आणि जवळपास ७५ मशिदींमध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात अदा केली. त्यानंतर एकमेकांच्या गळाभेटी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
छावणीतील इदगाहमध्ये जामा मशिदीचे पेश इमाम हाफीज जाकीरसाहाब यांच्या नेतृत्वात प्रचंड मोठ्या जमावाने ईदची मुख्य नमाज अदा केली. तत्पूर्वी, मौलाना नसीम मुफ्ताही, जमात- ए- इस्लामीचे हाफीज इलियास फलाही, मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलचे मेराज सिद्दीकी आणि जामिया इस्लामिया काशीफ- उल- उलुमचे प्रमुख मोईज फारुकी यांनी बयानाद्वारे पवित्र रमजान महिन्याचे, रोज्यांचे तसेच खैरात, फितरा व जकात यांचे महत्त्व विशद केले. यावेळी उपस्थित जमावाने समाजहिताचे अकरा ठराव सर्वानुमते मंजूर केले.
छावणीतील इदगाहसमोर वक्फ बोर्डातर्फे उभारण्यात आलेल्या मंडपात ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, (पान २ वर)