विशेष पॅकेजसह दुष्काळ जाहीर करा- एकनाथ शिंदे
By Admin | Updated: November 15, 2014 23:55 IST2014-11-15T23:45:43+5:302014-11-15T23:55:38+5:30
पूर्णा : मराठवाड्यात पिकांची परिस्थिती गंभीर आहे़ दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन परभणी, हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा,

विशेष पॅकेजसह दुष्काळ जाहीर करा- एकनाथ शिंदे
पूर्णा : मराठवाड्यात पिकांची परिस्थिती गंभीर आहे़ दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन परभणी, हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करीत या प्रश्नी शिवसेना आंदोलनाची भूमिका घेईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दिली़
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते पूर्णा तालुक्यातील खुजडा येथे आले होते़ यावेळी आ़राहुल पाटील, आ़ सदा सरवणकर, आ़ सुनील शिंदे, आ़सुभाष साबने, आ़ विजय शिवतारे, आ़ अजय चौधरी, आ़ प्रकाश फातरतेकर, आ़ मंगेश कुडाळकर, आ़ तुकाराम कोत, आ़ रुपेश म्हात्रे, आ़ डॉ़ बालाजी केवीकर आदी उपस्थित होते़ एकनाथ शिंदे यांनी रमाकांत कुऱ्हे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली़ त्यानंतर खुजडा, फुकटगाव येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली़ आम्हाला नुकसान भरपाईची रक्कम थोडी उशिराने मिळाली तरी चालेल़ पण, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था आधी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली़ जायकवाडी प्रकल्पाचे पाणी टेल टू हेड असे देणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही़ या बाबत पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करू, चारा छावण्या उभारण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल, असेही शिंदे यावेळी म्हणाले़ या प्रसंगी सहसंपर्कप्रमुख शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ कच्छवे, सखुबाई लटपटे, सुधाकर खराटे, बाळासाहेब जाधव, नितीन कदम, श्याम कदम, राजू एकलारे, मनोज उबाळे, प्रा़ गोविंद कदम, काशीनाथ काळबांडे, अॅड़ राजेश भालेराव, शंकर गलांडे, गजानन हिवरे, किशोर सरोदे, मुंजा कदम आदी पदाधिकाऱ्यांसह मुरलीधर कुऱ्हे, बापूराव कुऱ्हे, नरहरी कुऱ्हे, रोहिदास बोकारे, माणिका बोकारे, सुभाष बोकारे, तुळसीराम बोकारे, जगन्नाथराव मोरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)