‘इफ्तार’च्या पेंडखजूराचा २० टक्क्यांनी भाव वधारला

By Admin | Updated: July 4, 2016 00:27 IST2016-07-04T00:06:32+5:302016-07-04T00:27:06+5:30

राजकुमार जोंधळे, लातूर रमजाननिमित्त लातूरच्या बाजारपेठेत पेंडखजुरांची आवक वाढली असून, गतवर्षीपेक्षा यंदा पेंडखजूराचा भाव २० टक्क्यांनी वधारला आहे.

'Ehtaad's penny yield rose by 20 percent | ‘इफ्तार’च्या पेंडखजूराचा २० टक्क्यांनी भाव वधारला

‘इफ्तार’च्या पेंडखजूराचा २० टक्क्यांनी भाव वधारला


राजकुमार जोंधळे, लातूर
रमजाननिमित्त लातूरच्या बाजारपेठेत पेंडखजुरांची आवक वाढली असून, गतवर्षीपेक्षा यंदा पेंडखजूराचा भाव २० टक्क्यांनी वधारला आहे. बाजारात २५ पेक्षा अधिक पेंडखजुरांचे विविध प्रकार दाखल झाले आहेत.
परदेशातून बाजारात दाखल झालेल्या पेंडखजुरांचीच सध्या चलती असून, ५० ते १२०० रुपये प्रतिकिलोपर्यंतचा भाव आहे. दिवसाकाठी जवळपास २५ क्विंटलची उलाढाल होत आहे. परदेशी पेंडखजूर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे देशी पेंडखजुराला अधिक मागणी आहे. रमजान महिन्यात इफ्तारसाठी लागणारे विविध प्रकारचे पेंडखजूर लातूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक, लिबिया,अरबस्तान आदीं राष्ट्रातून या पेंडखजुरांच्या विविध जातींची आवक झाली आहे. परेदशातून आलेल्या पेंडखजुरांचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे देशी पेंडखजुरांना नागरिकांची मागणी जास्त आहे. सध्याला बाजारात २५ पेक्षा अधिक प्रकार बाजारात उपलब्ध असल्याचे व्यापारी जमिलनाना शेख यांनी सांगितले. इफ्तारसाठी प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या पेंडखजुरांचे दर ५० रुपयांपासून सुरु होत असून ते तब्बल १५०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो आहेत. ब्लॉक आय, किमिया, जबरी आदीं जातींचे पेंडखजूर हे १४० ते १८० रुपये प्रतिकिलोच्या भावात विकले जात आहेत. तर इराणी पेंडखजूर ७० ते ८० रुपये किलो आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी पेंडखजुरांचे भाव वधारले आहेत.
रमजान महिन्यात या पेंडखजुरांची प्रतिदिन १५ टनापर्यंत विक्री होते. एकट्या लातूर शहरात दररोज ३ टनांपेक्षा अधिक पेंडखजुराची विक्री होत असल्याचे व्यापारी अब्बास शेख यांनी सांगितले. विशेष म्हणजे, देशी पेंडखजुरांना सर्वसामान्यांतून अधिक मागणी आहे. परदेशी पेंडखजुरांचा भाव हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. किमान २५० रुपये ते १५०० हजारांपर्यंत प्रतिकिलो भाव असल्यामुळे हे सर्वसामन्यांना खाणे शक्य नाही. बाजारात दाखल होणाऱ्या जातीमध्ये इराण, इराक, लिबिया, अरबस्तानातून आलेल्या पेंडखजुराला ठराविक ग्राहकांची मागणी असते.

Web Title: 'Ehtaad's penny yield rose by 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.