शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

सिल्लोडमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 3:14 PM

माणिकनगर भवन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीमुळे फसला. 

सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या माणिकनगर भवन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीमुळे फसला. 

बुधवारी (दि. 5) पहाटे तीनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांना भवन येथील जिल्हा बँक शाखेच्या काही अंतरावर एक कार संशयादस्पद उभी दिसली. चौकशी करण्यासाठी पोलिस थांबले असता कारमध्ये चालक व पाठीमागे एक व्यक्ती बसलेला दिसला. पोलिसांना बघताच वाहन चालकाने कार सुरु करून पळ काढला. 

पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता पिंपळगाव पेठ रस्त्याने एक ते दीड किलोमीटर चोरटे पळाले व कार रस्त्यात सोडून अंधारात कपाशी शेतातुन पसार झाले. गस्तीवर असलेल्या फौजदार संदीप सावले, चालक विकास नायसे, राठोड़ यांनी घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटिल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांना दिली. त्यांनी अतिरिक्त पोलिस कर्मचारी पाठवून चोरट्यांचा शोध घेतला पण अंधाराचा फायदा घेवून चोरटे पसार झाले. 

चोरटयानी या गुह्यात वापरलेली कार (एमएच.20.बीसी.2385) पोलिसांनी ताब्यात घेतली. कारमध्ये दोन लोखंडी कटर, चार लोखंडी कटवण्या, एक धारदार चॉपर, एक मोठा स्क्रू ड्रायव्हर अशी हत्यारे व कटरने कट केलेले 3 कुलूप सापडले. 

पथक रवानासीसीटीव्ही फुटेजवरून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिस पथक रवाना झाले असून लवकरच आरोपीना जेरबंद करण्यात येईल. - विशाल नेहुल, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिल्लोड.

टॅग्स :RobberyचोरीbankबँकPoliceपोलिस