पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर दुरुस्तीचे जोरदार प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:42+5:302021-05-15T04:04:42+5:30

--- औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला पीएम फंडातून प्राप्त व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचा प्रकार समोर आला होता. याला लोकमतने वाचा फोडल्यावर ...

Efforts to repair ventilator in PM Care Fund | पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर दुरुस्तीचे जोरदार प्रयत्न

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर दुरुस्तीचे जोरदार प्रयत्न

---

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला पीएम फंडातून प्राप्त व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचा प्रकार समोर आला होता. याला लोकमतने वाचा फोडल्यावर यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटर दुरुस्तीचा खटाटोप करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी लागणारे सुटे भागाची जुळवाजुळव करण्याची वेळ कंपनीवर ओढावली आहे.

दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीकडून आटकोट प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी शुक्रवारी कंपनीचे आणखी वरिष्ठ अभियंते दाखल झाले असून ते व्हेंटिलेटर दुरुस्तीच्या कामात लागले होते. सायंकाळपर्यंत त्यांना यश आले नव्हते. साॅफ्टवेअरचाही दोष समोर आल्याने दिवसभर अभियंते साॅफ्टवेअरच्या दुरुस्तीत गुंतलेले होते. घाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांची संख्या अद्यापही अधिक असून व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. डाॅक्टरांनी हे व्हेंटिलेटर वापरायोग्य नसल्याचा अहवाल यापूर्वीच दिला आहे. तरीही दुरुस्ती करून हे व्हेटिलेटर घाटीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न गेला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

---

संध्याकाळपर्यंत दुरुस्त झाले नाही व्हेंटिलेटर

--

अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अद्याप व्हेंटिलेटर दुरुस्तीसंदर्भात माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. कंपनीचे प्रमुख राजेश कुमार आज येणार होते. ते दुपारपर्यंत पोहचतील. त्यांचे अधिकारीही दुपारपर्यंत आलेले नव्हते. ते दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करत आहेत. अद्यापतरी दुरुस्त व्हेंटिलेटर आम्हाला मिळालेले नसल्याचे मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या. तर सायंकाळी घाटी प्रशासनाकडून यासंबंधी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही.

--

Web Title: Efforts to repair ventilator in PM Care Fund