कृषी कार्यालयाच्या स्थलांतराचे प्रयत्न
By Admin | Updated: May 23, 2015 00:40 IST2015-05-23T00:29:58+5:302015-05-23T00:40:01+5:30
उदगीर : देवणी येथे अस्तित्वात असलेल्या तालुका कृषी कार्यालयाचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत़

कृषी कार्यालयाच्या स्थलांतराचे प्रयत्न
उदगीर : देवणी येथे अस्तित्वात असलेल्या तालुका कृषी कार्यालयाचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत़ मुख्य रस्त्यावरील कार्यालय सोडून गैरसोयीच्या ठिकाणी हे कार्यालय हलविले जात असल्याचा आरोप आता संघटनांकडून सुरु झाला आहे़ हे कार्यालय सध्याच्याच ठिकाणी रहावे, यासाठी राजकीय प्रयत्न सुरु आहेत़ देवणी येथील निलंगा-उदगीर राज्य रस्त्याच्या शेजारीच असलेल्या एका इमारतीत भाडेतत्वावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय कार्यरत आहे़ मुख्य रस्त्यावर कार्यालय असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरले आहे़ तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कृषी साहित्याची वाहतूक करणेही शेतकऱ्यांना सुलभ होते़ परंतु, गेल्या काही दिवसांपासून हे कार्यालय गैरसोयीच्या ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे़ नव्या ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे़ तसेच कृषी साहित्याची वाहतूक करणेही रस्त्याअभावी कठीण बनणार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे़ हे कार्यालय अन्यत्र हलवू नये, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा हावगीराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पटणे, बस्वराज पाटील, तालुका अध्यक्ष वैजनाथ आष्टुरे, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ गरिबे, किसान आघाडीचे प्रकाश पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अमर पाटील, शिवाजी तपसाळे, ओम धनुरे, निजामोद्दीन उंटवाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़(वार्ताहर)