जिवे मारण्याचा प्रयत्न, चौघांना पोलिस कोठडी
By Admin | Updated: March 28, 2016 00:08 IST2016-03-27T23:55:43+5:302016-03-28T00:08:55+5:30
बदनापूर : तालुक्यातील चनेगाव येथे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जिवे मारण्याचा प्रयत्न, चौघांना पोलिस कोठडी
बदनापूर : तालुक्यातील चनेगाव येथे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील चनेगाव येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू व फायटरने पोटावर डावी बरगडी व डोक्यावर मारून ज्ञानेश्वर जायभाये व संजय जायभाये यांना गंभीर जखमी केल्याची फिर्याद राजू कारभारी जायभाये (रा. चनेगाव) यांनी दिल्यावरून विष्णू बारीकराव सानप ब्रह्मा बारीकराव सानप, हरीदास बारीकराव सानप व देवानंद विष्णू सानप यांच्याविरूध्द बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदाळे यांनी दिली. (वार्ताहर)