अर्धवट शिक्षण झालेल्या विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी
By Admin | Updated: May 24, 2014 00:42 IST2014-05-24T00:33:59+5:302014-05-24T00:42:35+5:30
परभणी : जिल्ह्यातील १० ते १६ या वयोगटातील ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण अर्धवट झाले आहे, अशा विद्यार्थिनींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या झाले आहे.

अर्धवट शिक्षण झालेल्या विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी
परभणी : जिल्ह्यातील १० ते १६ या वयोगटातील ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण अर्धवट झाले आहे, अशा विद्यार्थिनींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. या शाळेत अशा मुलींना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. गंगाखेड, ंिजंतूर, मानवत, परभणी, पाथरी, पूर्णा व सेलू या ठिकाणी शासनाने २००८-०९ पासून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या नावाने निवासी शाळा सुरु केली आहे. पाचवी ते दहावी या वर्गात १५० मुलींना प्रवेश दिला जातो. नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निवास, भोजन, गणवेश, दैनंदिन गरजेच्या वस्तू व इतर सुविधा पुरविल्या जातात. शाळेत दाखल करण्यात आलेल्या मुलींच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची तयारीही करुन घेतली जाते. तसेच संगणक शिक्षण, शिवणकाम, हस्तकलेच्या वस्तू तयार करणे, दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करणे, बेनटेक्स ज्वेलरी तयार करणे अशी व्यावसायिक प्रशिक्षणही या ठिकाणी दिली जातात. स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण त्याचप्रमाणे चित्रकला, संगीत, क्रीडा आदी विषयांसाठी सर्व भौतिक सुविधा व तज्ज्ञ शिक्षक विद्यालयात उपलब्ध आहेत. मुलींच्या आरोग्या संदर्भात साप्ताहिक आरोग्य तपासणी, तीन महिन्यांना रक्त तपासणी केली जाते. (प्रतिनिधी)मोफत दिल्या जाणार्या सुविधांबरोबरच मुलींना दरमाह विद्यावेतनही दिल्या जाते. जिल्ह्यातील वंचित व दुर्बल घटकातील शाळाबाह्य मुलींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी या विद्यालयात उपलब्ध करुन दिली आहे. या विद्यालयातील प्रवेशासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किंवा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डुंबरे यांनी केले आहे.