नगरसेवकासह तिघांना कोर्ट संपेपर्यंत बसण्याची शिक्षा
By Admin | Updated: May 2, 2017 23:32 IST2017-05-02T23:31:30+5:302017-05-02T23:32:57+5:30
बीड : निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी लावलेला मंडप काढण्यास विलंब केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक जगदीश गुरखुदे यांच्यासह अन्य दोघांना मंगळवारी न्यायालयाने कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली.

नगरसेवकासह तिघांना कोर्ट संपेपर्यंत बसण्याची शिक्षा
बीड : निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी लावलेला मंडप काढण्यास विलंब केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक जगदीश गुरखुदे यांच्यासह अन्य दोघांना मंगळवारी न्यायालयाने कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली. शिवाय प्रत्येकी ३४०० रुपये दंडही केला.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी १५ एप्रिल २०१४ रोजी बीडमधील माळीवेस भागात सभा पार पडली होती. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, मंदार देशपांडे हे सभेचे संयोजक होते. सभेचा मंडप लक्ष्मण जाधव यांनी उभारला होता. सभा संपल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेला मंडप काढून घेणे अपेक्षित होते. परंतु तो काढण्यास विलंब केला. त्यामुळे शहर ठाण्यात वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा नोंद झाला होता. तिसऱ्या सह. दिवाणी न्यायाधीशांनी या तिघांनाही सकाळी ११ ते सायं. ६ पर्यंत कक्षाबाहेर बसण्याची शिक्षा दिली. तिघेही दिवसभर बाकड्यावर बसून राहिले होते. (प्रतिनिधी)