बालसदनच्या मुलांच्या शिक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:02+5:302020-11-12T07:28:02+5:30

लायन्स दिवाळी मिठाई विक्री \Sऔरंगाबाद : बालसदनच्या मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लायन्स दिवाळी मिठाई विक्री केंद्रे सुरू करण्यात आली ...

For the education of the children of the kindergarten | बालसदनच्या मुलांच्या शिक्षणासाठी

बालसदनच्या मुलांच्या शिक्षणासाठी

लायन्स दिवाळी मिठाई विक्री

\Sऔरंगाबाद : बालसदनच्या मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लायन्स दिवाळी मिठाई विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद, लायनेस क्लब ऑफ औरंगाबाद आणि मधुर मिलन मिठाई यांच्या तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बालसदन, उस्मानपुरा व सुंदर टी कंपनी, जाधवमंडी येथे ही विक्री केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्यात मोतीचूरचे लाडू, बेसन बर्फी, पोहा चिवडा, मसाला शेव आदी पदार्थ उपलब्ध आहेत.

या विक्रीतून येणारा पैसा बालसदनच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जातो. सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेल्या या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन अशोक रुणवाल, तनसुख झांबड, अध्यक्षा उषा नागपाल, माधुरी चौधरी, विमला हब्बू, लता रुणवाल, मनोज पाटणी आदींनी केले आहे.

Web Title: For the education of the children of the kindergarten