शिक्षणसम्राटांच्या दुकानदारीला लागणार ‘ब्रेक’
By Admin | Updated: June 16, 2015 00:50 IST2015-06-16T00:30:00+5:302015-06-16T00:50:53+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड प्राचार्य, प्राध्यापक होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (पीएच. डी., सेट-नेट) नसलेलेच प्राचार्य, प्राध्यापक आहेत. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे

शिक्षणसम्राटांच्या दुकानदारीला लागणार ‘ब्रेक’
व्यंकटेश वैष्णव , बीड
प्राचार्य, प्राध्यापक होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (पीएच. डी., सेट-नेट) नसलेलेच प्राचार्य, प्राध्यापक आहेत. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे. याची काळजी ना शासनाला आहे, ना.. शिक्षणसम्राटांना. मात्र आता विद्यापीठानेच या शिक्षणाच्या बाजारीकरणाला रोख लावण्याचे धोरण अवलंबले असून, ज्या पदवी, पदवीत्तर महाविद्यालयात पात्रता धारक प्राचार्य, प्राध्यापक नाहीत. त्यांचे अॅडमिशन विद्यापीठ स्तरावर स्विकारले जाणार नाही. अशी ठाम भूमिका घेतल्याने शिक्षणसम्राटांच्या दुकानदारीलाच ‘ब्रेक’ लागला आहे.
पदवी, पदवीत्तर शिक्षणाचा बाजार सर्वत्र मांडला आहे. उच्च शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शैक्षणीक अर्हता प्राप्त केलेले उमेदवार मिळत नसल्याचा गवगवा सस्थांकडून जाणीवपूर्वक केला जातो. कारण पीएच. डी., सेट-नेट, उत्तीर्ण झालेले उमेदवार वेतन जास्त मागतात. यामुळे ‘अन्कॉलिफाईड’ असलेल्यांना पाच-दहा वर्र्ष फुकटात राबवून घेतले जाते.
जाहिराती केवळ नावालाच....
महाविद्यालयांकडून पात्रताधारक उमेदवार पाहिजेत, अशा जाहिराती काढल्या जातात. या जाहिरातील केवळ विद्यापीठाच्या स्तरावर दाखविण्यासाठी प्रसिद्ध केल्या जातात. जाहिरात वाचून आलेल्या पात्रता धारकांना कुठल्यातरी एका अटीवर आडवून डावलण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला जातो. मात्र आता मराठवाडा विद्यापीठाने पात्रताधारक उमेदवार असल्याशिवाय संबंधीत महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने शिक्षणसम्राटांची गोची झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत बीड जिल्ह्यात एकूण ४१५ च्या जवळपास महाविद्यालय आहेत.
४संबंधीत विद्यापीठाने ५ जून रोजी महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात म्हटले की, ३० जून पर्यंत पात्रता धारक अध्यापकांची नियुक्ती करून अहवाल कळवावा.
४यामुळे आता संस्थाचालकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.