स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खाद्यतेल सर्वाधिक महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST2021-05-13T04:04:51+5:302021-05-13T04:04:51+5:30

: पॅकिंगमध्ये करडी तेल २२० रुपये लिटर औरंगाबाद : खाद्यतेलात महागाईचा भडका उडाला आहे. मागील दिवळीपासून आतापर्यंत खाद्य तेलात ...

Edible oil the most expensive since independence | स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खाद्यतेल सर्वाधिक महाग

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खाद्यतेल सर्वाधिक महाग

: पॅकिंगमध्ये करडी तेल २२० रुपये लिटर

औरंगाबाद : खाद्यतेलात महागाईचा भडका उडाला आहे. मागील दिवळीपासून आतापर्यंत खाद्य तेलात ५० ते ६० टक्क्याने भाववाढ झाली आहे. ब्रॅण्डेड पॅकिंगमध्ये करडी तेल २२० रुपये, शेंगदाणा तेल १८० रुपये सूर्यफूल तेल १७४ रुपये, सोयाबीन १५६ रुपये प्रति किलोने विकल्या जात आहे. हे भाव पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत.

सध्या भाववाढीचे सर्व विक्रम मोडीत काढीत खाद्यतेल उच्चांकी पातळीवर आहेत. किरकोळ विक्रीत नॉन ब्रॅण्डेड करडी तेल १९५ रुपये लिटर विकत आहे. तर ब्रॅण्डेड करडी तेल चक्क २२० रुपये लिटर आहे.

अतिवृष्टी व नंतर अवकाळी पाऊस यामुळे करडी, शेंगदाणा, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. शेंगदाण्याची सुरू झालेली निर्यात व पामतेलावरील आयात शुल्कात झालेली वाढ हेच महागाई बोकळण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितल्या जात आहे.

जगन्नाथ बसय्ये यांनी सांगितले की, ग्राहक पहिले सर्वात कमी भाव कोणत्या तेलाचे आहे, ते बघतात व तेच खरेदी करतात. पूर्वी करडी, शेंगदाणा तेल जे एकदम ५ लिटर खरेदी करत होते ते आता २ लिटरच खरेदी करत आहेत. पॅकिंग व किरकोळ विक्रीत खाद्य तेलाच्या भावात थोडीच तफावत राहिली आहे.

चौकट

सरकी तेल गायब

बाजारातून सध्या सरकी तेल गायब झाले आहे. त्यामुळे तेलच नाही तर भाव काय सांगायचे, असे विक्रेते ग्राहकांना सांगत आहेत. दिवाळीनंतर नवीन सरकी बाजारात येईल, तोपर्यंत भाव चढेच असतील. ग्राहक सरकी ऐवजी सोयाबीन किंवा पामतेल खरेदी करीत आहेत.

श्रीकांत खटोड

व्यापारी

---

चौकट

ब्रॅण्डेड खाद्यतेलाचे भाव

खाद्यतेल १२ एप्रिल १२ मे

(लिटर)

करडी तेल १८० रु. २२० रु.

शेंगदाणा तेल १७० रु. १८० रु.

सूर्यफूल तेल १६० रु. १७४ रु.

सोयाबीन तेल १३० रु.१५६ रु.

पामतेल १२० रु.१३६ रु.

मोहरी तेल १४५ रु. १७० रु.

चौकट

कोरोनापुढे महागाई दबली

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. सरकार ही कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. खाद्यतेलातील भाववाढीकडे दुर्लक्ष होत आहे.

सुषमा सरदेशपांडे

ग्राहक

Web Title: Edible oil the most expensive since independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.