अंधारी-लोणवाडी पळशी रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:05 AM2021-04-11T04:05:37+5:302021-04-11T04:05:37+5:30

लोणवाडी-पळशी या दहा किलोमीटर रस्त्याचे काम लालफीतीत : पंधरा वर्षांपासून वाहनधारकांच्या नशिबी यातना अंधारी : अंधारी-लोणवाडी-पळशी या रस्त्याला खड्ड्यांचे ...

Eclipse of potholes on Andhari-Lonwadi Palashi road | अंधारी-लोणवाडी पळशी रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण

अंधारी-लोणवाडी पळशी रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण

googlenewsNext

लोणवाडी-पळशी या दहा किलोमीटर रस्त्याचे काम लालफीतीत : पंधरा वर्षांपासून वाहनधारकांच्या नशिबी यातना

अंधारी : अंधारी-लोणवाडी-पळशी या रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर गेल्या दीड दशकापासून नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर मुरूम टाकून या रस्त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. त्यातही अंधारीपासून ते लोणवाडीपर्यंतच्या दहा किलोमीटर रस्त्याचे काम लालफीतीत अडकले आहे. निवडणुका आल्या की, लोकप्रतिनिधी रस्त्याची दुरुस्ती करू, असे आश्वासन नागरिकांना देतात. निवडणुका संपल्या की पुन्हा लोकप्रतिनिधी आश्वासनेही विसरून जातात. एकीकडे शासन ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी देते; परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अंधारी ते पळशी रस्त्याला निधी मिळेना. खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात सत्र सुरूच आहे. त्यामुळे अंधारी ते लोणवाडी- पळशी या दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नागरिक म्हणतात...

अंधारी-लोणवाडी-पळशी परिसरातील जवळपास १५ ते २० गावांचा रहदारीचा मुख्य रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे हाल सुरू आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. - महानंदा तायडे, सरपंच, अंधारी.

अंधारीसह लोणवाडी रस्त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून डागडुजी केली गेली; परंतु लोणवाडी ते पळशीपर्यंतच्या दहा किलोमीटर रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून लालफीतीत अडकले आहे. संबंधित विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी राहील.

-भाऊसाहेब सुलताने, सरपंच लोणवाडी

छायाचित्रे : अंधारी ते पळशी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Eclipse of potholes on Andhari-Lonwadi Palashi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.