साथरोगांचा उद्रेक उमेदवारांसाठी ‘ताप’दायक !

By Admin | Updated: September 30, 2014 01:27 IST2014-09-29T23:51:49+5:302014-09-30T01:27:25+5:30

बीड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच जिल्ह्यात साथरोगांनी डोके वर काढले आहे़ साथरोगांचा वाढता उद्रेक उमेदवारांसाठी तापदायक ठरु शकतो,

Eating outbreak candidates' fever! | साथरोगांचा उद्रेक उमेदवारांसाठी ‘ताप’दायक !

साथरोगांचा उद्रेक उमेदवारांसाठी ‘ताप’दायक !



बीड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच जिल्ह्यात साथरोगांनी डोके वर काढले आहे़ साथरोगांचा वाढता उद्रेक उमेदवारांसाठी तापदायक ठरु शकतो, अशी शक्यता आहे़ आजघडीला तीन गावांत उद्रेक सुरु असून आणखी काही वस्त्या, तांडे फणफणल्याच्या तक्रारी आहेत़
धारुर तालुक्यातील सोनीमोहा, वडवणी तालुक्यातील कोठरबन, पाटोदा तालुक्यातील मंझेरी या गावांमध्ये साथरोगांचे थैमान आहे़ शिवाय बीड तालुक्यातील घोसापूरी येथे जलजन्य आजाराची साथ आहे़ या तीन गावांत मिळून ६५ रुग्ण तापेने फणफणले आहेत़ या गावांमधील १६ रक्तनमुने तपासणीसाठी घेतले होते़ त्यापैकी दोघांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले तर ६ जणांना चिकुन गुनिया झाला आहे़ दरम्यान, मंझेरी व सोनीमोहा येथे डेंग्यूने प्रत्येकी एक बळी गेला़ त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ तेथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला़ साथरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले़
निवडणुकीच्या तोंडावर साथरोगाने डोके वर काढल्याने उमेदवार धास्तावले आहेत़ ताप, चिकुन गुनियासारचा आजार अंगावर घेऊन लोक मतदानासाठी घराबाहेर पडणार नाहीत, अशी उमेदवारांना चिंता लागली आहे़अद्यापपर्यंत निवडणूक विभागाकडून साथरोगांच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात कुठल्याही सूचना नाहीत;परंतु आरोग्य यंत्रणा सज्ज असून योग्य उपाययोजना सुरु आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले़ (प्रतिनिधी)
वस्त्या, तांड्यांवर साथरोगांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर आहे़ तेथे पाणी, आरोग्य या सुविधांच्या बाबतीत फारशा सुविधा नसतात़ त्यामुळे तेथील पाण्यातून साथरोग फै लावतात़ त्यामुळे वस्त्या, तांड्यांवरील रहिवाशांनी अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़
४मतदान प्रक्रियेत साथरोगांचा अडथळा होऊ नये, यासाठी उपाययोजना सुरु आहेत़ जनजागृती, धूरफवारणी, सुरु आहे़ नागरिकांनी ‘ड्राय डे’ पाळावा, असे आवाहन डॉ़ वडगावे यांनी केले़

Web Title: Eating outbreak candidates' fever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.