शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

लग्न करणे सोपे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:40 IST

महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये उंबरठे झिजवावे लागतात

औरंगाबाद : कोरोना संसर्गानंतर तर लग्न समारंभ अत्यंत छोटेखानी स्वरूपात उरकण्यावर भर देण्यात येत आहे. लग्न करणे सोपे आणि नंतर विवाह प्रमाणपत्र मिळविणे अवघड अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही अनेक दिवस प्रमाणपत्र मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी प्रमाणपत्रावर वेळेवर सह्याच करीत नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

अलीकडे अनेक ठिकाणी लग्न प्रमाणपत्राची मागणी केली जाते. कायद्याच्या दृष्टीनेही हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. लग्न झाल्यानंतर विविध कागदपत्रांसह मनपाच्या वॉर्ड कार्यालयात अर्ज दाखल करावा लागताे. शहरात महापालिकेची नऊ झोन कार्यालये आहेत. लग्न कोणत्या झोनच्या हद्दीत झाले त्यावरून संबंधित झोनवर जबाबदारी निश्चित केलेली आहे. महापालिकेने लग्न प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. महापालिकेच्या फक्त झोन ब कार्यालयात किमान १० दिवसांमध्ये प्रमाणपत्र देण्यात येते. इतर वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान दीड ते दोन महिने नागरिकांना चकरा माराव्या लागतात.

कोणती कागदपत्रे आवश्यकजन्माचा दाखला, शाळेची टी.सी. लाइट बिल, फोन बिल, रेशनकार्ड, आधार, निवडणूक कार्ड, पाच पासपोर्ट फोटो, ४ बाय ६ आकाराचा मुलाचा-मुलीचा फोटो, ३ साक्षीदार, मालमत्ता कर, पाणीपट्टी भरलेले प्रमाणपत्र.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढाल?फॉर्म भरल्यानंतर महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात विविध कागदपत्रांसह तो सादर करावा. २० दिवसात प्रमाणपत्र देणे संबंधित वॉर्ड कार्यालयाला बंधनकारक केले आहे.

६५ ते २१५ रुपये खर्चलग्न झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी ६५ रुपये, ३ ते ९ महिने लग्नाला झाल्यास ११५ रुपये, ९ महिन्यांपेक्षा जास्त अवधी असेल तर २१५ रुपये फी आकारली जाते.

एजंट हा प्रकार नाही...महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये एजंट हा प्रकार नाही. मात्र, वॉर्डातील संबंधित कर्मचाऱ्यांकडूनच दिरंगाई केली जाते. कागदपत्रांची तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष करावी लागते. अनेकदा संबंधित अधिकारीच उपलब्ध नसतात.

किमान दोन महिने लागतातमहापालिकेच्या नऊपैकी आठ वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान २ महिने तरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागतात. काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करा म्हणून आणखी वेळ लावण्यात येतो.

एक महिन्यापासून सॉफ्टवेअर बंदमहापालिकेचे जुने सॉफ्टवेअरच एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे महिनाभरात एकही प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीमार्फत नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले खरे, पण ते अद्याप सुरू झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका