जिल्ह्यात राबविणार सुलभ पीककर्ज अभियान
By Admin | Updated: June 25, 2017 23:40 IST2017-06-25T23:36:07+5:302017-06-25T23:40:03+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील विविध गावामध्ये सुलभ पीककर्ज अभियान योजनेंतर्गत बँकेतर्फे पीककर्ज अभियान २८ जूनपासून राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात राबविणार सुलभ पीककर्ज अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील विविध गावामध्ये सुलभ पीककर्ज अभियान योजनेंतर्गत बँकेतर्फे पीककर्ज अभियान २८ जूनपासून राबविण्यात येणार आहे. यासाठी विविध बँकेचे शाखाव्यवस्थापक शेतकऱ्यांना पीक कर्जासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
यामध्ये २८ जून रोजी स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाख सेनगाव तर्फे बन, बरडा, भंडारी, बोरखेडी पी, बोरखेडी जी, धानोरा, डोंगरगाव, धोरदडी, हत्ता, हिवरखेडा, होलगिरा, कापडसिनगी, कवठा तर ३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता स्टेट बँक आॅफ इंडिया गोरेगाव शाखेच्यावतीने गोरेगाव, भगवती, चोंढी बु, चोंढी खु, गारखेडा, गोंधनखेडा, गुगूळपिंप्री, हाताळा, हिवरा, माहेरखेडा, जामठी बु, कडोळी, केंद्रा बु,खु, माहेरखेडा, माझोड, साबरखेडा, सुरजखेडा, ताकतोडा, तपोवन. ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सेनगाव स्टेट बँक आॅफ इंडिया सेनगाव शाखेतर्फे धामनी, बाभूळगाव, नानसी, पिंपरी, बरडा, साखरा, सोनसावंगी, उटी पूर्णा, वझर बु., येलदारी पाटोदा. तसेच १३ जुलै रोजी बोडखा, ब्राह्मणवाडा, चिंचखेडा, हत्ता, जाम आंध, केलसूला, खडकी, खैरी, खिल्लार, कोळसा, लिंबाळा, हुडी लिंबाळा तांडा, लिंगदरी, सेनगाव, सापटगाव. १४ जुलै रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक पानकनेरगाव शाखेतर्फे पानकनेरगाव, जयपूर, सिनगी खांबा, वेलतुरा. तर महाराष्ट्र ग्रामीण बँक सेनगाव शाखेतर्फे १६ जुलै रोजी सेनगाव, पानकनेरगाव, कोंडवाडा, आमदरी, भानखेडा, चिखलागर, गणेशपूर, गोंडाळा, कनेरगाव, कवरदडी, म्हाळसापूर, मकोडी, रिधोरा, शिवणी बु, शिवणी खु, सिनगी नागा, सुकळी बु आणि खु, तळणी, तांदुळवाडी, वडहिवरा, वरुड चक्रपान, लिंबाळा. महाराष्ट्र ग्रामीण बँक आजेगाव शाखे तर्फे २१ जुलै रोजी आजेगाव, शेगाव, दाताडा बु, खु, धनगरवाडी, कहाकर बु, बटवाडी, खैरखैडा, मन्नास पिंप्री, पळशी, सावरखेडा, शिंदेफळ, सिंदगी खु, वाघजाळी, वाढोणा, वलाना, वरखेडा, वटकळी, म्हाळशी. २२ जुलै रोजी पुसेगाव येथील ग्रामीण बँकेच्यावतीने आडोळ, हुडी, जांभरुन बु, पुसेगाव, वरुड सामंत, हनकदरी, खुडज, लिंगपिंपरी, पार्डी पो, रेपा या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे.