शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

'भूकंप, प्लेग व कोरोना'; ७४ वर्षांत चौथ्यांदा भरली नाही कर्णपुरा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 11:49 IST

Navratri : नवरात्रोत्सवात कर्णपुरातील हा परिसर आकाशपाळणे व विविध करमणुकीची साधने, दुकानांनी गजबजून गेलेला असतो. मात्र, यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट दिसत आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यापूर्वी येथे छोट्या प्रमाणात यात्रा भरत असेएकदाच घडले नाही देवीचे दर्शन

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : नवरात्रोत्सव ( Navratri ) व कर्णपुरा यात्रा (  Karnapura Yatra ) हे समीकरण झाले आहे. मात्र, गुरुवारी पहिल्या माळेला जेव्हा भाविक कर्णपुरा देवीच्या दर्शनाला जात होते, तेव्हा त्यांना कर्णपुऱ्यातील मोकळे मैदान पाहून काहीतरी हरवल्यासारखे जाणवत होते. कोरोनामुळे (Corona Virus ) यंदा येथील यात्रा भरली नाही. पण, यात्रा न भरण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजे मागील ७४ वर्षांत चार वेळा कर्णपुरा यात्रेला खंड पडला आहे. यंदा यात्रा भरली नसली, तरी थेट मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

स्वातंत्र्यापूर्वी येथे छोट्या प्रमाणात यात्रा भरत असे; पण नंतर जसजशी लोकसंख्या वाढत गेली व शहराचा विस्तार होत गेला, तसतसा कर्णपुरा यात्रेचा आकारही वाढत गेला. कोरोनामुळे मागील वर्षी व यंदा कर्णपुरा यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर १९९३ मध्ये किल्लारीचा भूकंप झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात यात्रा भरविण्यात आली नव्हती. दुसऱ्या वर्षी सप्टेंबर १९९४ मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली होती. त्याही वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली होती, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते करणसिंह काकस यांनी दिली.

एकदाच घडले नाही देवीचे दर्शनकिल्लारीचा भूकंप, सुरतमधील प्लेगच्या साथीमुळे सलग दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, भाविकांना तेव्हा देवीच्या दर्शनासाठी परवानगी देण्यात आली होती. यंदाही यात्रा रद्द झाली असली, तरी पहिल्या माळेपासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. फक्त २०२० मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक होती. यामुळे यात्राच नव्हे, तर मंदिरही बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना त्याच एका वर्षी देवीचे दर्शन घेता आले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNavratriनवरात्री