शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सोशल मिडियावर 'लाईक' करुन पैसे कमवा; तरुणाला दीडशे रुपये देऊन पावणेतीन लाखांना लुटले

By सुमित डोळे | Updated: November 29, 2023 16:24 IST

फसवणूक होतेय, हे कळेपर्यंत सायबर गुन्हेगारांना सात टप्प्यांत २ लाख ७२ हजार १०० रुपये ट्रान्सफर मिळाले होते

छत्रपती संभाजीनगर : फावल्या वेळेत युट्यब चॅनेलला 'लाईक' करुन पैसे कमावण्याच्या जाहिरातीची सुशिक्षित तरुणाला लिंक आली. परंतू सायबर गुन्हेगारांनी पहिले त्याला १५० रुपये देऊन नंतर त्याच्याकडून २ लाख ७२ हजार रुपये उकळून फसवले. याप्रकरणी बेगमपुरा पाेलिस ठाण्यात संबंधित मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

३३ वर्षीय पंकज भालेराव (रा. हर्सुल) हे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कंपनीत अकाऊंट असिस्टन्सट आहे. काही दिवसांपुर्वी त्यांना अनोळखी व्हॉट्स ऍप क्रमांकावरुन मेसेज प्राप्त झाला. 'फावल्या वेळेत यु ट्युब चॅनेलला लाईक करुन पैसे कमवा' असा मेसेज प्राप्त झाला. त्यात एका वेबसाईटची लिंक होती. भालेराव यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना पहिले सर्व माहिती देण्यात आली. विश्वस बसल्याने ते पुढिल प्रक्रियेत सहभागी झाले.

१५० रुपये आले अन् विश्वास बसलासायबर गुन्हेगारांनी ते प्रक्रियेत सहभागी होताच १५० रुपये पाठवले. त्यानंतर पुढिल टास्क पेड असून १ हजार भरल्यास १२०० रुपये मिळतील, असे सांगितले. त्यानुसार भालेराव यांनी अनुक्रमे १ व ३ हजार रुपये पाठवले. या दरम्यान, सायबर गुन्हेगार वेळोवळी त्यांना कॉल करुन विश्वास बसेल असे संभाषण साधत होते. परंतू पैसे मात्र दिले नाही. आपली फसवणूक होतेय, हे कळेपर्यंत सायबर गुन्हेगारांना सात टप्प्यांत २ लाख ७२ हजार १०० रुपये ट्रान्सफर मिळाले होते. सायबर पोलिसांनी यात तपास केला. मात्र, काही ठोस निष्पन्न होऊ शकले नाही. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाAurangabadऔरंगाबाद