केजमध्ये उमेदवार कोण याचीच उत्सुकता

By Admin | Updated: June 12, 2014 01:36 IST2014-06-12T00:16:44+5:302014-06-12T01:36:25+5:30

मधुकर सिरसट , केज राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केज विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपाचे गोपीनाथराव मुंडे यांना ३० हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले़

The eagerly interested candidate in Cage | केजमध्ये उमेदवार कोण याचीच उत्सुकता

केजमध्ये उमेदवार कोण याचीच उत्सुकता

मधुकर सिरसट , केज
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केज विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपाचे गोपीनाथराव मुंडे यांना ३० हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले़ त्यामुळे विधानसभेत काय चित्र राहते? हे पाहणे रोमांचक ठरेल़ तूर्त उमेदवारीवरुनच भाजपा व राष्ट्रवादीत खल सुरु आह़ त्यामुळे आखाड्यात कोणाची कोणासोबत झुंज होते, याचीच सर्वांना उत्कंठा आहे़
मागील अनेक वर्षांपासून राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात कै़ विमल मुंदडा यांचा एकछत्री अंमल राहिला़ शिवसेना, भाजपाकडून प्रत्येकी एकदा तर राष्ट्रवादीकडून सलग तीन टर्म त्या विधानसभेत निवडून गेल्या़ ‘ओन्ली विमल’या नाऱ्याने सामान्यांच्या हृदयाचा ठाव घेतला होता़ त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे या नवख्या तरुणाला मतदारांनी संधी दिली़
मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्यातच कायम रंगतदार लढती झालेल्या आहेत़ यावेळी वेगळी स्थिती नाही़ विमल मुंदडा, गोपीनाथराव मुंडे यांच्या निधानाने दुसऱ्या फळीतील कार्यकर्र्त्यांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे, विमल मुंदडा यांच्या स्रुषा नमिता अक्षय मुंदडा ही दोन नावे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत़ विमल मुंदडा यांच्यानंतर मिळालेल्या संधीची परतफेड म्हणून आ़ साठे हे स्पर्धेतून माघार घेऊ शकतात़ भाजपात मात्र, उमेदवारीवरुन सध्या चांगलीच चुरस निर्माण झाली आहे़ नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या प्रा़ संगीता ठोंबरे या गतवेळच्या भाजपाच्या उमेदवार आहेत़ दुसरीकडे भारिपशी फारकत घेऊन बहुजन विकास मोर्चाची स्थापना करणारे बाबूराव पोटभरे हेदेखील प्रबळ दावेदार मानले जातात़ लोकसभा निवडणुकीत मुंडेंच्या मदतीला ते धावून गेले होते़ मुंडे यांच्या निधनाने उमेदवारीसाठी इच्छुकांना पक्षश्रेष्ठीकडे साकडे घालावे लागणार आहे़ त्यामुळे पक्ष कोणाला संधी देतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे़
राष्ट्रवादीचे रमेश आडसकर, अंबाजोगाईचे राजकिशोर मोदी नंदकिशोर मुंदडा यांचाही या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे़ त्यांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण आहेत़ सलग तीन टर्म व पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी देणारा येथील मतदारराजा यावेळी काय करतो? याचे उत्तर निकालानंतरच मिळेल़
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
राष्ट्रवादीपृथ्वीराज साठे ८५,७५०
भाजपाप्रा.संगीता ठोंबरे ७७,४४४
अपक्षअ‍ॅड़ शिवाजी कांबळे २,२८१
इच्छुकांचे नाव पक्ष
पृथ्वीराज साठे राकाँ.
नमिता मुंदडाराकाँ
प्रा़ संगीता ठोंबरेभाजपा
बाबूराव पोटभरेभाजपा

Web Title: The eagerly interested candidate in Cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.