ई-सेवा केंद्र २४ तास सुरु राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:38 IST2017-09-14T00:38:50+5:302017-09-14T00:38:50+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत असून त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र पुढील दोन दिवस २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत़

ई-सेवा केंद्र २४ तास सुरु राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत असून त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र पुढील दोन दिवस २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत़
शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज १५ सप्टेंबरपूर्वीच दाखल करावेत़ या तारखेनंतर अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळणार नाही़ असे शासनाचे निर्देश आहेत़ त्यामुळे ई-सेवा केंद्रावर शेतकºयांची मोठी गर्दी होत आहे़ ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पीककर्जाचे अर्ज भरताना अडचणीही येत आहेत़ त्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दोन दिवसांत शेतकºयांना अर्ज दाखल करण्यास पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने पुढील दोन दिवस ई-सेवा केंद्र २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
१ एप्रिल २००९ नंतर पुनर्रचना झालेल्या कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेत करण्यात आलेला आहे़ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २ लाख ५९ हजार २५९ शेतकरी कुटुंबांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत़ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्हा पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत़ ज्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्यास त्यांनी त्वरित तहसीलदार व सहायक निबंधक सहकारी संस्था येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरणा केलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या उपलब्ध करुन दिल्या आहेत़ कर्जमाफीमध्ये आपले नाव आॅनलाईन यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले़