शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

औरंगाबादमध्ये जालना रोडवर ई-रिक्षाला ब्रेक; पर्यटनस्थळी जाणार्‍या रस्त्यावरच वाहतुकीची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 4:02 PM

शहरातील जालना रोडसह अनेक रस्त्यांवर ई-रिक्षा धावण्याला ब्रेक लागला आहे. ई-रिक्षांच्या वेगमर्यादेमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील उड्डाणपुलावर प्रवासी वाहतुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे. पर्यटनस्थळी ये-जा करणार्‍या काही मोजक्या रस्त्यांवरच ई-रिक्षाला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशहरातील जालना रोडसह अनेक रस्त्यांवर ई-रिक्षा धावण्याला ब्रेक लागला आहे. ई-रिक्षांच्या वेगमर्यादेमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील उड्डाणपुलावर प्रवासी वाहतुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील जालना रोडसह अनेक रस्त्यांवर ई-रिक्षा धावण्याला ब्रेक लागला आहे. ई-रिक्षांच्या वेगमर्यादेमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील उड्डाणपुलावर प्रवासी वाहतुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे. पर्यटनस्थळी ये-जा करणार्‍या काही मोजक्या रस्त्यांवरच ई-रिक्षाला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. या बैठकीतील इतिवृत्त आणि घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी बुधवारी (दि. १०) प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे उपस्थित होते. शहरात ई-रिक्षांची विक्री सुरू झाली; परंतु आरटीओ कार्यालयात ई-रिक्षांची नोंदणी होत नव्हती. पाच महिन्यांपासून रिक्षांच्या नोंदणीची प्रतीक्षा केली जात होती. दरम्यानच्या कालावधीत अनेकांनी इंधनावर चालणारी रिक्षा खरेदीवर भर दिला. अखेर आरटीओ कार्यालयात ई-रिक्षांची नोंदणी सुरू झाली; परंतु त्यानंतर वाहतुकीचे मार्ग ठरत नसल्याने ई-रिक्षा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला. आतापर्यंत केवळ ५ रिक्षांचीच कार्यालयात नोंद झाली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत काही मार्गांवर वाहतुकीची परवानगी देण्यात आली. शहरातील वाढती वाहन संख्या, लोकसंख्या, वाहतुकीची कोंडी, अडथळे, अरुं द रस्ते याचा विचार करून काही मार्गांवर या रिक्षांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नवीन रिक्षांची अट शिथिलअनधिकृत रिक्षा आणि टॅक्सींना यापुढे दंड भरून नवे परवाने (परमिट) दिले जातील, अशी घोषणा २२ सप्टेंबरला करण्यात आली; परंतु औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने जुन्या रिक्षांवर परवाने चढवलेच नाहीत. प्रादेशिक परिवहन समितीच्या पूर्वीच्या निर्णयाची अडचण सांगण्यात येत होती. ही परिस्थिती लक्षात घेता ३१ मार्च २०१८ पर्यंत परवान्यावर नवीन रिक्षांची नोंद करण्याची अट शिथिल करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली. 

या मार्गावर ई-रिक्षा वाहतुकीची परवानगी- रेल्वेस्टेशन ते बीबीका मकबरा- मध्यवर्ती बसस्थानक ते पाणचक्की- रेल्वेस्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद लेणी.- रेल्वेस्टेशन ते टीव्ही सेंटर व्हाया कर्णपुरा, छावणी, घाटी, आमखास मैदान, सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गणेश कॉलनी, सलीम अली उद्यान.- पैठण बसस्थानक ते जायकवाडी प्रकल्प- संत एकनाथ मंदिर-संत ज्ञानेश्वर उद्यान.- खुलताबाद बसस्थानक ते घृष्णेश्वर मंदिर- वेरूळ लेणी.

इतर काही महत्त्वाचे निर्णय- रिक्षा, टॅक्सीमध्ये परवानाधारक, चालकाची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक. - आरटीओ कार्यालय रिक्षा, टॅक्सींसाठी क्यूआर क ोड स्टिकर तयार करणार.- विमानतळावर कुलकॅबच्या परमिटसाठी कार्यालयाची अट शिथिल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद