शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामात ई-प्रक्रिया धाब्यावर; १०० कोटींच्या निविदा निघणार एकदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:42 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही भागांत प्रस्तावित डांबरी रस्त्यांची कामे एकाच दिवशी देऊन शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा घाट घातला जात आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही भागांत प्रस्तावित डांबरी रस्त्यांची कामे एकाच दिवशी देऊन शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा घाट घातला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्कल आॅफिसच्या टेंडर सेक्शनमध्ये या कामांचे एकाच दिवशी म्हणजेच शुक्रवारी राजकीय गणिते लक्षात घेऊन वाटप केले जाणार असल्याचे समजते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यांत रस्त्यांचे डांबरीकरण, जालना जिल्ह्यातील जालना आणि परतूर विभागांतील काही रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आली. ही सर्व कामे जवळपास शंभर कोटी रुपये खर्चाची आहेत. मात्र, या निविदा प्रक्रियेची कालमर्यादा वाढवीत ती एकाच दिवशी करण्याचा घाट घातला गेला. औरंगाबाद जिल्ह्यातील टेंडर नोटीस क्रमांक २१, टेंडर नोटीस क्रमांक १६, टेंडर नोटीस क्रमांक ४५, टेंडर नोटीस क्रमांक ४५ बी, जालना टेंडर नोटीस क्रमांक १५ आणि परतूर टेंडर नोटीस क्रमांक ४ ची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मात्र, राजकीय दबाव आणि बाहेरच्या ठेकेदारांचा शिरकाव सहज व्हावा यासाठी हे सर्व कंत्राट एकाच दिवशी वितरित करण्याचा प्रयत्न अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून मर्जीतील ठेकेदारास ही कामे दिली जावीत, यासाठी लॉबिंग केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जास्तीच्या किमतीचे कंत्राट मंजूर करून शासनाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष कसे होऊ शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र, तिची दखल घेतली गेली नसल्याचे दिसून येत आहे.  

बाहेरच्या ठेकेदारांचा शिरकाव राजकीयदृष्ट्या फायदेशीर असलेल्या व्यक्तींनाच रस्ते कामांचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. सिंचन व इतर क्षेत्रातील ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते कामांचे कंत्राट देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अननुभवी असलेल्या या ठेकेदारांकडून कामांच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

महिनाभरा पूर्वी प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे  बुजविण्याबाबत संबंधित ठेकेदारांची बुधवारी बैठक घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांतील रस्ते कामांची निविदा प्रक्रिया महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आली आहे. -अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादfundsनिधीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग