२८१ कृषी केंद्रांना ई-पॉस यंत्रे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:04 IST2017-09-20T00:04:21+5:302017-09-20T00:04:21+5:30
जिल्ह्यात एकूण ७१० परवानाधारक कृषी सेवा केंद्र असून त्यातील २८१ केंद्रांना जि. प. कृषी विभागाकडून ई-पॉस मशीन वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित केंद्रांसाठी शासनाकडे यंत्राची मागणी करण्यात आली आहे.

२८१ कृषी केंद्रांना ई-पॉस यंत्रे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात एकूण ७१० परवानाधारक कृषी सेवा केंद्र असून त्यातील २८१ केंद्रांना जि. प. कृषी विभागाकडून ई-पॉस मशीन वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित केंद्रांसाठी शासनाकडे यंत्राची मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून सध्या ई-पॉस मशीन अनिवार्य करण्यात आली आहे. विविध शासकीय योजनेअंतर्गत लाभधारकांना धान्य तसेच खत व बी-बियाणे ई-पॉस मशीननेच देणे बंधनकारक करण्यात आले. जिल्ह्यातील केवळ २८१ कृषी परवानाधारकांना ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील २४५ कार्यान्वित असून उर्वरित ई-पॉसमध्ये तांत्रिक अडचणी आहेत. शिवाय शासनाकडेही यंत्रांचा तुटवडा असल्याने मशीन वाटपाची कामे टप्प्या-टप्प्याने केली जात आहेत. प्रत्येक तालुक्यांना ५० ते ६० याप्रमाणे यंत्र वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. उर्वरित ४२९ मशीनची मागणी जि. प. कृषी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. शासनाकडून दर्जात्मक मशीनच देण्याचा प्रयत्न असून एका यंत्राची जवळपास २० ते २१ हजार रुपये किंमत आहे. अनेक ठिकाणी खत-बियाणातील घोटाळ्यांना आता आळा बसण्यास मदत होणार आहे. परंतु ज्यांच्याकडे मशीनच उपलब्ध झाल्या नाहीत. त्यांना मात्र पूर्वीप्रमाणेच नियोजन करावे लागणार आहे. ई-पॉसची मागणी केली असली तरी अद्याप पुरवठा झाला नाही. लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.