दंड वसुलीसाठी ग्रामीण पोलीसांकडे ‘ई चलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:14 IST2017-08-10T00:14:36+5:302017-08-10T00:14:36+5:30

कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देत ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांना बुधवारपासून ई चलन देण्यास सुरुवात केली

 'E-challan' to rural police for recovery of fine | दंड वसुलीसाठी ग्रामीण पोलीसांकडे ‘ई चलन’

दंड वसुलीसाठी ग्रामीण पोलीसांकडे ‘ई चलन’

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देत ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांना बुधवारपासून ई चलन देण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी याबाबतचे प्रशिक्षण पोलीस अधीक्षक कार्यालयात वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचाºयांना देण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह म्हणाल्या की, एका खाजगी आय. टी. कंपनीच्या मदतीने पोलिसांनी ई चलन मशीनचा वापर सुरू केला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या वाहनचालकांकडे अनेकदा पैसे नसतात, अशा वेळेस वाहन परवाना जप्त करून त्यांना चलन देऊन एक तर कोर्टात हजर होण्यास सांगितले जाते अथवा वाहतूक शाखेत दंड भरून वाहनपरवाना घेऊन जाण्यास सांगितले जाते. वाहनचालकांची सोय व्हावी आणि कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य द्यावे, या हेतूने ग्रामीण पोलिसांनी ई चलन सुविधा सुरू केली. वाहनचालकांना आता डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे दंडाची रक्कम भरणे शक्य होईल. यासाठी पहिल्या टप्प्यात ५० ई चलन मशीन वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या.
या मशीनमध्ये वाहन नंबर आणि वाहनचालकाचा मोबाइल नंबर टाकल्यानंतर त्या वाहनावर यापूर्वी किती केसेस करण्यात आल्या, वाहन चोरीचे आहे अथवा नाही, यापूर्वी वाहतूक नियम मोडल्यामुळे त्यांनी दंडाचा भरणा केला अथवा नाही, याबाबतची माहिती एका सेकंदात दिसेल, अशी माहिती ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले.
वाहनचालक आणि वाहनाचे छायाचित्र घेण्याची सुविधा या मशीनमध्ये आहे. हे यंत्र ब्ल्यू ट्रुथच्या माध्यमातून संगणकाशी कनेक्ट केले जाईल आणि त्यातील रोजचा डाटा संगणकात हस्तांतरित होईल.

Web Title:  'E-challan' to rural police for recovery of fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.