उपजिल्हा रुग्णालय परिसरात अस्वच्छता
By Admin | Updated: May 13, 2014 01:01 IST2014-05-13T00:15:14+5:302014-05-13T01:01:38+5:30
सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उपजिल्हा रुग्णालय परिसरात अस्वच्छता
सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच प्रसूती, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात ये-जा सुरु असते. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. काटेरी झुडपे व टाकाऊ वस्तू सर्वत्र पसरल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. रुग्णालयातील सकाळच्या वेळी बाह्यरुग्ण विभाग सुरु असतो. त्यामुळे शहरातील महिला रुग्ण उपचारासाठी येतात. या कक्षाच्या परिसरातच अस्वच्छता आहे. दोन वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, या वृक्षांचे संवर्धन न झाल्यामुळे हा परिसर उजाड झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यांच्या निवासाची सोय नाही. तसेच आसनव्यवस्था देखील नाही. (प्रतिनिधी) तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव उपजिल्हा रुग्णालयात नेहमीच वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त राहत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर केवळ प्राथमिक उपचार करुन परभणी येथे पाठविले जाते. दुर्देवाने अपघात घडल्यास जखमींची संख्या अधिक असल्यास वैद्यकीय अधिकारी अपुरे पडतात. अधिकार्यांची रिक्त पदे व परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आले आहे.