जनरेटरचा डायनुमा फोडून तांब्याची तार चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:05 IST2021-04-24T04:05:16+5:302021-04-24T04:05:16+5:30

दुधड : येथील शेतकरी बळीराम तारव यांच्या शेतातून जनरेटरच्या डायनुमाचे इंजिन फोडून चोरट्यांनी त्यातील तांब्याची तार चोरून नेली. तसेच ...

The dynamo of the generator was broken and the copper wire was stolen | जनरेटरचा डायनुमा फोडून तांब्याची तार चोरली

जनरेटरचा डायनुमा फोडून तांब्याची तार चोरली

दुधड : येथील शेतकरी बळीराम तारव यांच्या शेतातून जनरेटरच्या डायनुमाचे इंजिन फोडून चोरट्यांनी त्यातील तांब्याची तार चोरून नेली. तसेच इंजिनचे ऑईल व डिझेलसुद्धा लांबवले.

दुधड शिवारात गट क्रमांक २४३मध्ये शेतकरी बळीराम तारव यांनी फळझाडांची लागवड केली आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांनी कंटाळून ४८ हजार रुपये किमतीचे जनरेटर विकत घेतले होते. शेतातील पत्र्याच्या खोलीत त्यांनी जनरेटर ठेवले होते. बुधवारी रात्री चोरट्यांनी लोडशेडिंगचा फायदा घेत कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. इंजिनची तोडफोड करुन त्यातील तांब्याची तार व इंजिनचे ऑईल व डिझेल चोरून नेले. करमाड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुरेश सोनवणे करत आहेत.

फोटो : दुधड शिवारातील बळीराम तारव यांच्या शेतातून इंजिन फोडून डायनुमातील तांब्याची तार चोरून नेली.

230421\ratnakar vasantrao tambat_img-20210422-wa0087_1.jpg

दुधड शिवारातील बळीराम तारव यांच्या शेतातून इंजन फोडून डायनुमातील तांब्याची तार चोरून नेली.

Web Title: The dynamo of the generator was broken and the copper wire was stolen