मधमाशा चावल्याने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: January 17, 2017 00:17 IST2017-01-17T00:15:03+5:302017-01-17T00:17:19+5:30
उस्मानाबाद : शेतात काम करीत असताना मधमाशा चावल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला़

मधमाशा चावल्याने महिलेचा मृत्यू
उस्मानाबाद : शेतात काम करीत असताना मधमाशा चावल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी सायंकाळी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बु़) शिवारात घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बु़) येथील सविता दामाजी कापसे (वय-४५) या सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे गावच्या शिवारातील शेतात कामाला गेल्या होत्या़ काम करीत असताना एका झाडावरील मधमाशा अचानक उठल्याने त्यांनी सविता कापसे यांना चावा घेतला़ या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी सविता कापसे यांना तत्काळ उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले़ याबाबत सुरेश रणदिवे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़