सोयगावात धूळ पेरण्याच्या कामांनी घेतली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:04 IST2021-05-24T04:04:56+5:302021-05-24T04:04:56+5:30
सोयगाव तालुक्यात खरिपाच्या पेरण्यांसाठी धूळ पेरण्यांच्या पूर्व तयारीला गती आलेली आहे. यासाठी नांगरणी केलेल्या जमिनीचे चाळण करण्याचे काम शेतकऱ्यांनी ...

सोयगावात धूळ पेरण्याच्या कामांनी घेतली गती
सोयगाव तालुक्यात खरिपाच्या पेरण्यांसाठी धूळ पेरण्यांच्या पूर्व तयारीला गती आलेली आहे. यासाठी नांगरणी केलेल्या जमिनीचे चाळण करण्याचे काम शेतकऱ्यांनी सोयगाव तालुक्यात हाती घेतले असून यामध्ये जमीन भुसभुशीत होऊन धूळ पेरण्यांसाठी कसदार जमीन राहते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे रविवारपासून धूळ पेरण्यांसाठी जमीन तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या आहेत.
चौकट
बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी
तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर धूळ पेरण्या करतात. मात्र, यंदा शासनाने खरीप हंगामात बोंडअळींची साखळी तोडण्यासाठी कपाशीसह इतर खरिपाच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंधने घातली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक जूनपूर्वी बियाणे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे यंदाच्या हंगामात खरीपपूर्व पेरण्या रखडण्याची शक्यता आहे.
छायाचित्र ओळ : सोयगाव परिसरात धूळ पेरण्या पूर्व जमिनीची चाळण करतांना शेतकरी व दुसऱ्या छायाचित्रात ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरूण तयार.