दसरा महोत्सवात होणार सुधारणा
By Admin | Updated: August 15, 2014 00:05 IST2014-08-14T23:43:57+5:302014-08-15T00:05:28+5:30
हिंगोली: येथील प्रसिद्ध दसरा महोत्सवाच्या नियोजनासाठी आज घेण्यात आलेल्या विश्वस्तांच्या बैठकीत विविध सुधारणांबाबत निर्णय घेण्यात आले.

दसरा महोत्सवात होणार सुधारणा
हिंगोली: येथील प्रसिद्ध दसरा महोत्सवाच्या नियोजनासाठी आज घेण्यात आलेल्या विश्वस्तांच्या बैठकीत विविध सुधारणांबाबत निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, पं. स. सभापती छगन बनसोडे, रमेशचंद्र बगडिया, सुभाष लदनिया, प्राचार्य बरवे, ओम बियाणी, अॅड. एस. आर. पडोळे, प्राचार्य बरवे, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर आदींची उपस्थिती होती.
वेगवेगळ्या समित्यांमध्ये बदल करून कामात गती व पारदर्शकता आणण्यासह महसूलवाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तसेच मोक्याच्या व इतर जागांचा खुल्या पद्धतीने लिलाव करून दुकानदारांना देण्यात येतील. प्रदर्शनीसाठी खाजगीऐवजी शसकीय अधिकाऱ्यांकडे कामकाज सोपविण्याचे ठरले. तसेच पूर्वीच्या पद्धती रद्द करून नव्या पद्धतीने कामकाज करण्यासह अनुमती देण्यात आली. रामलीला मैदानाच्या सपाटीकरणासह इतर कामे स्थानिक रामलीला समितीद्वारे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आता कंत्राट पद्धत बंद करण्यात आली. त्याचबरोबर रामलीला ही आतापर्यंत पारंपरिकच होत होती. मात्र यावेळी लेजर अथवा तांत्रिकदृष्ट्या वेगळी असलेली बोलावून या महोत्सवाचे वैभव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर महसूलवाढीमुळे कुस्तीच्या स्पर्धांचे बक्षीसही वाढविणे शक्य आहे. त्यामुळे २१ हजार १५ हजार व ११ हजार अशी तीन बक्षिसे ठेवण्यात येणार असून बाहेरचे पंच बोलावून निपक्षपणे स्पर्धा खेळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)