लातुरात भर दिवसा तरुणाला भोसकले

By Admin | Updated: July 12, 2014 01:14 IST2014-07-12T00:09:29+5:302014-07-12T01:14:35+5:30

लातूर : मागील भांडणाच्या कारणावरून उद्योग भवन परिसरात दोन तरुणांत शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली.

During the floods, the youth wandered all day long | लातुरात भर दिवसा तरुणाला भोसकले

लातुरात भर दिवसा तरुणाला भोसकले

लातूर : मागील भांडणाच्या कारणावरून उद्योग भवन परिसरात दोन तरुणांत शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाला चाकूने भोसकले असून, पोटावर चार-पाच वार करण्यात आले आहेत. याबाबत शिवाजी नगर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लातूर शहरातील विलास अशोक करडे हा विद्यार्थी एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याच्यात व दादाराजे बाळासाहेब इंगळे यांच्यात जुना वाद होता. या वादाचे रुपांतर भोसकाभोसकीत शुक्रवारी झाले. दादाराजे बाळासाहेब इंगळे याने विलास अशोक करडे यास चाकूने भोसकले असून, त्याच्या पोटावर तीन-चार वार करण्यात आले आहेत, असे शिवाजी नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत विलासचे वडील अशोक करडे यांनी म्हटले आहे. त्यानुसार दादाराजे इंगळे याच्याविरुद्ध कलम ३०७ नुसार गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी दिली. अष्टविनायक परिसरात जयक्रांती महाविद्यालयासमोर ही घटना घडल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांची गर्दी रस्त्यावर झाली होती.
दरम्यान, तात्काळ शिवाजी नगर पोलिस ठाण्याची कुमक घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे जमाव पांगला. जखमी विलास करडे यास पोलिसांनीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असून, तो गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, आरोपी दादाराजे इंगळे याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस इंगळे याचा शोध घेत होते. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याने पोलिस त्याच्या शोधातच आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: During the floods, the youth wandered all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.