वडगावात भरदिवसा तीन कामगाराचे मोबाईल लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:04 IST2021-06-19T04:04:37+5:302021-06-19T04:04:37+5:30

मारुती शिवराज पावडे, शिवानंद शिंदे, हनुमंत शिंदे हे वडगाव कोल्हाटी येथील छत्रपतीनगरात शिवराज यांच्या घरात किरायाने राहतात. तिन्ही कामगार ...

During the day in Wadgaon, the mobiles of three workers were extended | वडगावात भरदिवसा तीन कामगाराचे मोबाईल लांबविले

वडगावात भरदिवसा तीन कामगाराचे मोबाईल लांबविले

मारुती शिवराज पावडे, शिवानंद शिंदे, हनुमंत शिंदे हे वडगाव कोल्हाटी येथील छत्रपतीनगरात शिवराज यांच्या घरात किरायाने राहतात. तिन्ही कामगार कंपनीत नाईट शिफ्ट करून गुरुवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरी परत आले. अंघोळ व नाश्ता केल्यानंतर मारुती पावडे याने त्याचा मोबाईल घरात चार्जिंगला लावला तर शिवानंद शिंदे व हनुमंत शिंदे यांनी त्यांचे मोबाईल उशीजवळ ठेवत घराचा दरवाजा लोटून घेऊन तिघेही घरात झोपी गेले. दरम्यान, सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास झोपेतून जागा आल्यावर मारुतीला मोबाईल दिसून न आल्याने त्याने शिवानंद व हनुमंत याला झोपेतून उठवत या प्रकाराची माहिती दिली. यानंतर शिवानंद व हनुमंत यांनी उशीजवळ ठेवलेले मोबाईल बघितले असता त्यांचेही मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले. मारुती पावडे यांनी तीन मोबाईल चोरी झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली आहे.

-------------------------

Web Title: During the day in Wadgaon, the mobiles of three workers were extended