राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या दुर्गेश, तुषारला कास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:51 IST2019-02-08T00:51:12+5:302019-02-08T00:51:32+5:30

गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर यांनी सांघिक कास्यपदक जिंकले. या स्पर्धेत महाराष्ट्राने फॉईल प्रकारात कास्यपदक जिंकले. कास्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात दुर्गेश जहागीरदार व तुषार आहेर या औरंगाबादच्या खेळाडूंसह नाशिकचा ऋत्विक शिंदे व सांगलीच्या अनिल महापती यांचा समावेश होता.

Durgesh of Aurangabad, Tusharala Bronze in National Senior Firing Championship | राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या दुर्गेश, तुषारला कास्य

राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या दुर्गेश, तुषारला कास्य


औरंगाबाद : गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर यांनी सांघिक कास्यपदक जिंकले. या स्पर्धेत महाराष्ट्राने फॉईल प्रकारात कास्यपदक जिंकले.
कास्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात दुर्गेश जहागीरदार व तुषार आहेर या औरंगाबादच्या खेळाडूंसह नाशिकचा ऋत्विक शिंदे व सांगलीच्या अनिल महापती यांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्राने बिहारचा १५-९ व केरळचा ४५-२८, असा पराभव केला होता. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला गोवा संघाने पराभूत केले. संघासोबत मार्गदर्शक म्हणून स्वप्नील तांगडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडीबद्दल राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष एस.पी. जवळकर, सचिव दिनेश वंजारे, मंजू खंडेलवाल, अजय त्रिभुवन, सागर मगरे, संजय भूमकर आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Durgesh of Aurangabad, Tusharala Bronze in National Senior Firing Championship