हाणामारीचा वसमतला झालेला प्रकार दुर्देवी

By Admin | Updated: August 24, 2014 23:54 IST2014-08-24T23:46:56+5:302014-08-24T23:54:52+5:30

वसमत : निष्ठावानांना ‘गद्दार’ म्हटल्यामुळे शिवसैनिकांच्या भावनांचा बांध फुटला, असे मत माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

Durdevi is the type of tragedy | हाणामारीचा वसमतला झालेला प्रकार दुर्देवी

हाणामारीचा वसमतला झालेला प्रकार दुर्देवी

वसमत : शिवसेनेच्या मेळाव्यात हाणामारी झाल्याचा प्रकार दुर्दैवी असून निष्ठावानांना ‘गद्दार’ म्हटल्यामुळे शिवसैनिकांच्या भावनांचा बांध फुटला, असे मत माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात डॉ. मुंदडा यांनी पत्रकार परिषद घेवून शनिवारच्या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. जिल्हा उपप्रमुख सुनील काळे, माजी तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी, बाजार समितीचे संचालक संभाजी बेले, काशिनाथ भोसले, दत्ता भालेराव, विलास नरवाडे, दीपक कुल्थे, पुरूषोत्तम इपकलवार, दीपक हळवे, नवीनकुमार चौकडा, आनंद बडवणे, प्रदीप मोरे आदी उपस्थित होते. डॉ. मुंदडा म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्र येवून काम करावे, अशी भावना नुतन संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार वसमत येथे पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीची मंडळी व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने सदरील प्रकार घडला, असे सांगून आपण त्या ठिकाणी असतो तर हा प्रकार घडला नसता, असा दावाही
डॉ. मुंदडा यांनी केला. (वार्ताहर)

Web Title: Durdevi is the type of tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.