दुकानात ट्रक घुसला
By Admin | Updated: April 11, 2015 00:18 IST2015-04-11T00:07:15+5:302015-04-11T00:18:54+5:30
जालना : भोकरदन नाका येथील किराणा दुकानाचे मालक वजाहत खान यांच्या दुकानात सळईने भरलेला ट्रक दुपारी तीन वाजता घुसल्याने दुकानासमोर उभी असलेल्या तीन दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.

दुकानात ट्रक घुसला
जालना : भोकरदन नाका येथील किराणा दुकानाचे मालक वजाहत खान यांच्या दुकानात सळईने भरलेला ट्रक दुपारी तीन वाजता घुसल्याने दुकानासमोर उभी असलेल्या तीन दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.
खान यांच्या दुकानासमोर दुचाकी गाडी उभ्या नसत्या तर सरळ ट्रक दुकानात घुसून जीवीत हानी होण्याची शक्यता वजाहत यांनी व्यक्त केली. हा ट्रक क्षमतेपेक्षा जास्त भरलेला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिस प्रशासनाने लक्ष देवून शहरात ओव्हरलोड जड वाहनांवर बंदी आणावी अशी मागणी जमलेल्या नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, ट्रक दुकानात घुसल्याचे कळताच परिसरातील शेकडो नागरिक जमा झाले होते. वाहतूकही काही वेळ ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)