छावणी चालकांचा आरक्षित पाण्यावर डल्ला
By Admin | Updated: April 15, 2016 00:38 IST2016-04-15T00:06:37+5:302016-04-15T00:38:16+5:30
पाटोदा/अंमळनेर : साठवण तलावातून पाणी उपसा बंद करण्यात आलेला असतानाही छावणी चालक रात्री, दिवसा बेदरवाडी, मूगगाव तलावातून पाणी उपसा करत आहेत.

छावणी चालकांचा आरक्षित पाण्यावर डल्ला
पाटोदा/अंमळनेर : साठवण तलावातून पाणी उपसा बंद करण्यात आलेला असतानाही छावणी चालक रात्री, दिवसा बेदरवाडी, मूगगाव तलावातून पाणी उपसा करत आहेत.
तालुक्यातील अंमळनेरजवळ असलेल्या कोतन येथील छावणीत पाणी नसल्याने जनावरांना पाण्यासाठी या चालकांनी येथून जवळ असलेल्या बेदरवाडी तलावातूनच अनधिकृत पाणी उपसा करण्यास सुरुवात केली आहे. रात्री छावणीतच बांधण्यात आलेल्या शेत तलावात पाणी टाकले जाते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून सावरगाव येथील छावणी चालक मूगगाव येथील इंचरणा तलावातून पाणी उपसा सुरु केला आहे तर सावरगाव नळ योजनेतूनच ग्रामस्थांऐवजी छावणीतच पाणी घेण्यात आले असल्यामुळे अरिक्षत पाण्यावर आता छावणी चाल डल्ला मारत आहेत. एकीकडे हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आलेली असताना हे छावणी चालक अरिक्षत पाणी पळवताहेत, यावर कारवाईची मागणी आहे. या बाबत कोतन येथील छावणी चालक रामा उगलमुगले म्हणाले नंतर बोलू, तर सावरगावचे छावणी चालक पांडुरंग सानप यांनी बाहेर असल्याचे सांगत प्रतिक्रीया देणे टाळले. (वार्ताहर)
अरिक्षत पाणी छावणी चालक पळवत असतील तर ही गंभीर बाब आहे. अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या छावणी चालकांची चौकशी करण्यात येईल.
- विक्र म देशमुख,
तहसीलदार पाटोदा.