रिक्त पदांमुळे अन्न-औषध ‘आॅक्सिजन’वर

By Admin | Updated: May 3, 2015 00:59 IST2015-05-03T00:43:13+5:302015-05-03T00:59:26+5:30

शिरीष शिंदे , बीड अन्न व औषध प्रशासन विभागातील सात पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. एका औषध निरीक्षकावर १३३७ औषधी दुकानांचा कारभार आहे

Due to the vacant positions on food and medicine 'Oxygen' | रिक्त पदांमुळे अन्न-औषध ‘आॅक्सिजन’वर

रिक्त पदांमुळे अन्न-औषध ‘आॅक्सिजन’वर


शिरीष शिंदे , बीड
अन्न व औषध प्रशासन विभागातील सात पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. एका औषध निरीक्षकावर १३३७ औषधी दुकानांचा कारभार आहे तर केवळ प्रभारी सहायक अन्न व एका सुरक्षा अधिकाऱ्यावरच जवळपास १० हजार छोट्यामोठ्या दुकानांच्या तपासणीची जबाबदारी आहे. एकंदरीत हे कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी आॅक्सिजनवर आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा संबंधी व औषध सुरक्षा संबंधी सर्व बाबींवर नियंत्रण असते. पहायला गेले तर या कार्यालयाकडे मोठी जबाबदारी आहे. परंतु या कार्यालयातील पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. यामुळे कारभार ढेपाळला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सद्य परिस्थितीला १ हजार १८७ औषधी दुकाने आहेत. होलसेल औषधी दुकानांची संख्या १५० आहे असे मिळून १ हजार ३३७ औषधी दुकाने आहेत. चार रक्तपेढ्या तर आठ रक्त साठवणूक केंद्रे आहेत. त्यात गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, अंबाजोगाई, नेकनूर येथील केंद्रांचा समावेश आहे.
औषधी विभागाकडे सदरील सर्व औषधी दुकानांचे परवाने नूतनीकरण, नोंदणीकरण, सॅम्पल काढणे, औषधी दुकानावर फार्मासिस्ट आहे की नाही याची तपासणी करणे तसेच न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणासाठी हजर राहणे ही प्रमुख जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. मात्र, सद्य परिस्थितीला औषध विभागात सहायक आयुक्त, औषध निरीक्षक व कनिष्ठ लिपीक ही तीन पदे रिक्त आहे. सहायक आयुक्तपदी जवळपास दोन वर्षांपासून तर औषध निरीक्षक हे पद एक वर्षापासून रिक्त आहे.
अतिरिक्त सहायक आयुक्त पद हे रूपेश व्हटकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. कनिष्ठ लिपीक पद रिक्त असल्यामुळे व्हटकर यांना स्वत:च नोटीस काढावी लागते. तसेच त्याचे वितरणही करावे लागते. अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे.
अन्न विभागात फार काही वेगळी स्थिती नाही. सद्य परिस्थितीला मोठ्या दुकानांची संख्या १ हजार ७६० तर छोट्या दुकानांची संख्या ९ हजार ८०६ इतकी आहे. मोठी हॉटेल्स ३९६ तर छोटी हॉटेल्स १ हजार २५ आहेत. याशिवाय छोट्यामोठ्या ढाब्याची संख्या १४७ आहे.
या सर्वांचे परवाने काढणे, त्याचे नूतनीकरण करणे, गरज पडल्यास तपासणी करणे यासह इतर महत्त्वाच्या बाबींची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. अन्न विभागात सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी हे पद रिक्त आहे. सहायक आयुक्तांचा पदभार सागर तेरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी डी. जी. वीर हे कार्यरत आहेत.
यामुळे दोन अधिकाऱ्यांवर या कामांची जबाबदारी आहे. न्यायालयीन कामकाजासह इतर दैनंदिन काम या अधिकाऱ्यांना करावे लागते. सदरील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक एस. आर. खोले यांच्याकडे रोखपाल, कार्यालयीन कामकाजाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

Web Title: Due to the vacant positions on food and medicine 'Oxygen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.