शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन; आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच

By विजय सरवदे | Updated: March 23, 2024 12:37 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आले सुमारे चार हजार मोबाइल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठी शासनाकडून सुमारे चार हजार स्मार्ट फोन उपलब्ध झाले आहेत. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर मोबाइल वाटपाचा पेच निर्माण झाला आहे.

अलीकडेच मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झाल्यामुळे एकात्मिक बालविकास विभागाच्या १४ प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात ३ हजार ४२३ अंगणवाड्या कार्यरत असून, यात ३ हजार २३० अंगणवाडी सेविका बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण व अन्य सुविधा देत आहेत. शासनाने अंमलात आणलेल्या पोषण ट्रॅकर ॲपवर बालकाचे दैनंदिन वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, अंगणवाड्यातील बालकांची उपस्थिती आदी सर्व प्रकारची माहिती सेविकांना भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. पण, अनेक वर्षे वापरात असलेले स्मार्ट फोन आता जुने झाल्यामुळे माहिती भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार शासनाने स्मार्ट मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतेच जि. प.च्या महिला व बालविकास विभागाकडे ग्रामीण भागातील अंगणवाड्या तसेच महापालिका, नगरपालिकांच्या नियंत्रणाखालील नागरी अंगणवाड्यांतील सेविका व पर्यवेक्षिकांसाठी शासनाकडून सुमारे ४ हजार स्मार्ट फोन प्राप्त झाले आहेत. मात्र, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे हे फोन वाटप करण्याचा पेच निर्माण झाला आहे. एक तर निवडणुका झाल्यानंतर अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोनचे वाटप करावे लागेल, नाही तर निवडणूक व निकाल जाहीर होण्यास दोन महिन्यांचा आवकाश आहे, तोपर्यंत मोबाइल वाटप थांबवावे लागेल. मात्र, ही प्रशासकीय बाब असल्यामुळे निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी घेऊन स्मार्ट फोन वाटप करता येईल का, या दिशेनेही जि. प. प्रशासन विचार करीत आहे.

निवडणूक विभागाची घ्यावी लागेल परवानगीमुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस अगोदर जिल्हा परिषदेकडे स्मार्ट फोन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तूर्तास अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ते वाटप करता येणार नाहीत. त्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही प्रशासकीय बाब असल्यामुळे निवडणूक विभागाची परवानगी मिळेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदSmartphoneस्मार्टफोन