सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:23 PM2018-08-11T18:23:00+5:302018-08-11T18:23:59+5:30

तालुक्यातील सराटी - बोदवड - वसई परिसरात आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक हेक्टर क्षेत्रातील मका आडवी झाली आहे.

Due to the storm surge in Sylod taluka | सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान

सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान

googlenewsNext

सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील सराटी - बोदवड - वसई परिसरात आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक हेक्टर क्षेत्रातील मका आडवी झाली आहे. या अतोनात नुकसानीमुळे तालुक्यातील शेतकरी हवाल दिल झाले आहेत. 

तालुक्यातील सराटी - बोदवड - वसई परिसरातील मका पीक आज झालेल्या वादळी वा-यामुळे जमीनदोस्त झाली आहे. या शिवाय तालुक्यात ठिकठिकाणी वादळीवाऱ्यामुळे सोयाबीन, मुंग, उडीद आदी पिके आडवी झाली आहेत. यामुळे पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. 

Web Title: Due to the storm surge in Sylod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.