शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट !

By admin | Updated: June 25, 2017 13:48 IST

वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.

शेतकरी हवालदिल ; बियाणे बाजारातील गर्दी ओसरली
अकोला : वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या दोन तीन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या अनिच्छिततेचा परिणाम बियाणे बाजारावर झाली असून, शेतकर्‍यांनी अद्याप पुर्ण शंभर टक्के कृषी निविष्ठाची खरेदी केलेली नाही.
अमरावती,अकोला,बुलडाणा व वाशिम जिल्हयात जवळपास ५0 ते ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्हयात १0 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत केल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी या आशेवर पहिल्याच पावसात जवळपास ५0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली पिके कोमेजू लागली आहेत. पाण्याची थोडीफार उपलब्धता असलेल्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून केला जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके उलटण्याची भीती असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ३२ लाखांवर क्षेत्र खरीप हंगामाचे आहे. यातील अध्र्याच्यावर म्हणजेच १७ लाख हेक्टर क्षेत्र हे अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्हय़ात आहे. अकोला वगळता बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात ५0 टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे; पण पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके करपू लागली असून, उर्वरित पेरण्यांना विलंब होत आहे. पिकांना तातडीने पावसाची गरज असल्याने शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ४ लाख १३ हजार हेक्टरवर कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले आहे. त्यातील २ लाख ५0 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. हे क्षेत्र ५१ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामातील पेरणीचे असून,जवळपास ४ लाख हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. घाटाखालील परिस्थिती नाजूक आहे.पाऊस न आल्यास घाटाखाली आणि घाटावरील पिके उलटण्याची शक्यता आहे. अक ोला जिल्हय़ातही ४ लाख ८६ हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील १0 टक्क्यांच्यावर पेरणी आटोपली आहे. यवतमाळ, अमरावती जिल्हय़ातही ५0 टक्क्यांच्या जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत.


- पाऊस लाबंला आणि तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली वर्‍हाडातील पिके कोमेजू लागली आहेत. बुलडणा जिल्हयातही हीच परिस्थिती आहे.घाटाखालची परिस्थिती नाजूक आहे. घाटावरही आता पाऊस हवा आहे. एक दोन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रमोद लहाळे,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
बुलडाणा.