सलग सुट्यांमुळे पर्यटनस्थळे बहरली
By Admin | Updated: August 17, 2016 00:55 IST2016-08-17T00:19:15+5:302016-08-17T00:55:17+5:30
औरंगाबाद : लगातार सुट्या आल्यामुळे देशभरातील पर्यटकांनी औरंगाबादेतील पर्यटनस्थळ पाहणे पसंत केले. सोमवारी अजिंठा लेणीला सुटी असल्याने पर्यटकांचा ओढा वेरूळ

सलग सुट्यांमुळे पर्यटनस्थळे बहरली
औरंगाबाद : लगातार सुट्या आल्यामुळे देशभरातील पर्यटकांनी औरंगाबादेतील पर्यटनस्थळ पाहणे पसंत केले. सोमवारी अजिंठा लेणीला सुटी असल्याने पर्यटकांचा ओढा वेरूळ, बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला पाहण्याकडे अधिक होता. यामुळे परिसर गर्दीने बहरून गेला होता. शहरवासीयांनी मिनी महाबळेश्वर असलेल्या म्हैसमाळ येथे जाऊन आनंद लुटला.
औरंगाबाद शहरात शनिवारपासूनच देशातील नव्हे तर विदेशातील पर्यटकांनी येणे सुरूकेले होते. रविवार व सोमवार हजारो लोकांपैकी काही जण बीबीका मकबरा, पाणचक्की तसेच देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले होते. याशिवाय म्हैसमाळ, सारोळा या ठिकाणी सहलीचा आनंद लुटला. शहरातील ११ चित्रपटगृहांचे सर्व शो हाऊसफुल होते.
तिकीट विक्रीचे नियोजन कोलमडले
पर्यटनस्थळ, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी हजारो पर्यटक शहरात आले होते.तिकीट विक्रीच्या दोनच खिडक्या असल्याने पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे बीबीका मकबरा व वेरूळ प्रशासनाची व्यवस्था कोलमडली होती.
विदेशी पर्यटक परत गेले
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा व वेरूळ लेणी हे जागतिक वारसा पाहण्यासाठी ६० पेक्षा अधिक विदेशी पर्यटक शहरात शनिवारी आले होते. सोमवारी अजिंठा लेणी बंद असते यामुळे रविवारी या पर्यटकांनी अजिंठा लेणी पाहिली व सोमवारी सकाळी वेरूळ लेणी गाठली पण येथे विदेशी पर्यटकांसाठी तिकिटाची स्वतंत्र व्यवस्था नव्हती. यामुळे लेणीचे बाहेरून फोटो काढून विदेशी पर्यटक शहरात बीबीका मकबरा पाहण्यासाठी आले येथेही तीच परिस्थिती होती. दुपारी ३ वाजता विमानाने त्यांना दिल्लीला जायचे असल्याने तेथूनही त्यांनी काढता पाय घेतला, असे जसवंतसिंग यांनी सांगितले.