रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक कोंडी काही अंशी सुटेल!

By Admin | Updated: March 22, 2017 00:39 IST2017-03-22T00:35:49+5:302017-03-22T00:39:11+5:30

जालना : शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत असून, या कामांमुळे वाहतूक कोंडी पूर्ण नाही पण काही अंशी सुटण्यास मदत होईल, असा सूर लोेकमत सर्व्हेक्षणातून उमटला.

Due to road concretion, traffic restrictions will be left to some extent! | रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक कोंडी काही अंशी सुटेल!

रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक कोंडी काही अंशी सुटेल!

जालना : शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत असून, या कामांमुळे वाहतूक कोंडी पूर्ण नाही पण काही अंशी सुटण्यास मदत होईल, असा सूर लोेकमत सर्व्हेक्षणातून उमटला. रस्ता काँक्रिटीकरणामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी सुटेल का याबाबत प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले.
नागरिकांना तीन प्रश्न विचारण्यात आले. रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक कोेंडी सुटण्यास मदत होईल का? यावर ४० टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर ५० टक्के नागरिक नाही म्हणतात. दहा टक्के नागरिकांना याबाबत काहीच सांगायचे नाही. एकूणच रस्ते चांगले झाले तरी रूंदीकरण गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काँक्रिटीकरणामुळे वाहतुकीला गती येईल का? रस्ते चांगले झाल्यामुळे वाहतूक गतीने होऊन काही ठिकाणी वाहतूक सुरळीत होऊ शकते असे ३० टक्के नागरिकांना वाटते तर ३० टक्के नागरिकांनाही असे होणार नाही असे वाटते. तर चाळीस टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. काँक्रिटीकरणीपेक्षा जुने रस्ते चांगले होते का? यावर जुन्या रस्त्यांपेक्षा काँक्रिटीकरणाचे रस्ते चांगले असल्याचे ५० टक्के नागरिकांना वाटते.
३० टक्के नागरिकांना नवीन रस्ते तयार करण्याची गरज नव्हती असे वाटते. तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच सांगितले नाही. यासोबतच अनेक नागरिकांनी अंतर्गत रस्त्यांचा मुद्दा उपस्थित करून शासनाने या रस्त्यांसाठीही विशेष निधी देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Due to road concretion, traffic restrictions will be left to some extent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.