शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात ‘महसूल’च्या कारवाईमुळे वाळूमाफियांत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:53 IST

 वाळूमाफियांसह जमीनमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाळूज महानगर : चार दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या पथकाने वाळूज परिसरात ठिकठिकाणी छापे मारून वाळू तस्कर व जमीन मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यामुळे वाळूमाफियांत खळबळ उडाली आहे. वाळूमाफियांसह जमीनमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गंगापूरचे तहसीलदार डॉ. अरुण जºहाड यांनी ४ नोव्हेंबरला धामोरी, लांझी, शिवराई, विटावा आदी भागात अचानक छापे टाकले होते. या कारवाईत परिसरातून जवळपास ५०० ब्रॉस वाळूची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी महसूल विभागानेवाळूज परिसरात गट नंबर २१० मध्ये छापे मारून मीनाबाई अहिरे, मुरलीधर केदारे (रा. वाळूज), अनिस शेख (रा. नारायणपूर) आदींनी १०० ब्रॉस वाळू चोरी केल्याचा पंचनामा केला होता.

धामोरी शिवारातील गट नंबर ७८ मधून रामेश्वर शेळके, कृष्णा शेळके (रा. धामोरी) नंदू शेळके, अनिल जमधडे (रा. वाळूज) व गट नंबर ८४ मधून चांगदेव हाडोळे, गट नंबर ८५ मधून अंकुश शेळके व अनिल जमधडे, गट नंबर ८७ मधून अशोक शेळके, तर गट नंबर ६१ मधून निवृत्ती हाडोळे, लांझी शिवारातील गट नंबर ९ मध्ये नितीन साबळे व नाथा शेळके (रा. दोघे शिवराई), बाबासाहेब क्षीरसागर, शकुंतला क्षीरसागर, सोन्या ऊर्फ प्रशांत चौरे (रा. वाळूज) आदींचा वाळू चोरीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्वांच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष बाब म्हणजे तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांच्यावर वाळूमाफिया पाळत ठेवत असून, त्यांच्या शासकीय वाहनाचा पाठलाग करणाऱ्या सोन्या ऊर्फ प्रशांत चौरे, विनोद कीर्तिशाही यांच्याविरुद्ध तहसीलदार जºहाड यांनी तक्रार दिली आहे.

वाळूमाफियांना पोलिसांचे अभयवाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरू असते. वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यांचे वाळू तस्करांशी साटे-लोटे असल्यामुळे या परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांकडून महिन्याकाठी मोठी ‘वरकमाई’ होत असल्यामुळे त्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादWalujवाळूज